शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

बारामतीकरांनीच केली साताºयात दुष्काळाची निर्मिती : जयकुमार गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 21:15 IST

‘माण, खटाव, खंडाळा, फलटण तालुक्यांच्या वाटणीचे पाणी पवारांच्या आदेशाने बारामतीला पळविण्यात आले. पदाच्या लालसेपोटी रामराजेंनी हे पाणी तिकडे जाऊ दिले. आता टँकर पुरवून आणि खासदार निधी देऊन दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी खा. शरद पवार

ठळक मुद्देशरद पवारांवर टीका; एक थेंबही जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नाही

सातारा : ‘माण, खटाव, खंडाळा, फलटण तालुक्यांच्या वाटणीचे पाणी पवारांच्या आदेशाने बारामतीला पळविण्यात आले. पदाच्या लालसेपोटी रामराजेंनी हे पाणी तिकडे जाऊ दिले. आता टँकर पुरवून आणि खासदार निधी देऊन दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी खा. शरद पवार पुढे येत आहेत. बारामतीकर पवार हेच सातारा जिल्ह्यातील दुष्काळाचे निर्माते आहेत,’ अशी कडवी टीका माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी केली.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आ. गोरे बोलत होते. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हेही यावेळी उपस्थित होते.आ. गोरे म्हणाले, ‘धरणांचे पाणी जिल्ह्याबाहेर पळविले जात असताना जिल्ह्यातील नेते मात्र काहीच करत नव्हते. जिल्ह्यातील जनतेने शरद पवार, अजित पवार यांच्यावर जीवापाड प्रेम केले तरी त्यांनी याच जनतेवर अन्याय केला. आता जिल्ह्याची तहान भागत नाही, तोपर्यंत आम्ही पाण्याचा एक थेंबही जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नाही. त्यासाठी कुठल्याही परिणामांना सामोरे जायची तयारी ठेवली आहे,’ असा इशाराही यांनी दिला. दरम्यान, साताºयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार होते, त्याला इथल्या स्थानिक नेत्यांनीच पाय आडवा घातला, तेच महाविद्यालय बारामतीला झाले, असा आरोपही आ. गोरे यांनी केला.

आ. गोरे म्हणाले, ‘जिल्ह्यातील नेत्यांनी आपली पदे वाचविण्यासाठी बारामतीकरांपुढे लोटांगण घातले. टेंभू योजनेत वांग-मराठवाडी, कोयना, तारळी धरणांचं पाणी जातं. कºहाड, खटाव या तालुक्यांतून कॅनॉल टाकून हे पाणी खानापूर, तासगाव, सांगोल्याला नेलं आहे. जिल्ह्याबाहेरचे ८० हजार ४७२ हेक्टर क्षेत्र टेंभू धरणामुळे पाण्याखाली आले. मात्र, कºहाड व खटाव तालुक्यातील शेतीला त्याचा फायदा झालेला नाही.’आमचं ठरलंय ‘त्यांचा’ कार्यक्रम करायचाभाजप प्रवेशाबाबत विचारले असता आ. गोरे म्हणाले, ‘पक्ष कुठलाही असला तरी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि माझ्यात मैत्री कायम राहील. माझ्याबाबतची भाजप प्रवेशाची चर्चा खोटी आहे. अनेकांनी मला संपविण्याचा प्रयत्न केला, आता मात्र त्यांना संपविण्यासाठी आमचं ठरलंय!,’ असे आ. गोरे म्हणाले.तासगावला पाणी गेलं; फलटणला नाही

रामराजेंच्या सहीनं बारामती, तासगाव, खानापूर, सांगोल्याला पाणी नेण्यात आलं. मात्र त्यांची सही फलटणला पाणी आणण्यासाठी उपयोगात आली नाही. या गोष्टीमुळे रामराजेंच्या घरातीलही त्यांच्या जवळ राहणार नाहीत, येत्या काही दिवसांत फलटणसह संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण बदलणार आहे, असे भविष्यही आ. गोरे यांनी वर्तवले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSharad Pawarशरद पवारJaykumar Goreजयकुमार गोरेWaterपाणी