बापू मंडलेवर फडतरेची मात

By Admin | Updated: August 26, 2015 21:23 IST2015-08-26T21:23:52+5:302015-08-26T21:23:52+5:30

म्हसवड कुस्ती मैदान : पोकळ घिस्सा डावावर विजय

Bapu Mandle beat floods | बापू मंडलेवर फडतरेची मात

बापू मंडलेवर फडतरेची मात

म्हसवड : येथील मैदानात झालेल्या कुस्ती मैदानात साताऱ्यातील पै. अमोल फडतरे याने सोलापूरच्या पै. बापू मंडले याला पोकळ घिस्सा डावावर चितपट करत अस्मान दाखविले. एक लाख रुपये बक्षिसाची ही प्रथम क्रमांकाची कुस्ती होती.
येथील मैदानासाठी सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतून पैलवान आले होते. प्रथम क्रमांकाची एक लाख रुपये बक्षीस असणारी कुस्ती ‘रासप’चे राज्य सरचिटणीस शेखर गोरे यांच्या वतीने लावण्यात आली. अमोल फडतरे व बापू मंडले यांच्यामध्ये तब्बल पाऊण तास लढत सुरू होती. अखेर पोकळ घिस्सा डावावर अमोल फडतरे याने बापू मंडलेला अस्मान दाखविले. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती वारणा येथील नाना ठोंबरे व सातारा येथील पांडुरंग माळवे यांच्यात झाली. ही कुस्ती बरोबरीत सुटली. तानाजी वीरकर आणि मोतिराम खामगळ यांच्यात तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती झाली. कुस्ती वीरकरने जिंकली.
विजेत्यांना श्रीयाळषष्ठी कुस्ती स्पर्धा समितीचे अध्यक्ष अजितराव राजेमाने व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, रावसाहेब मगर, शंकर काळे, रावसाहेब बनगर, महादेव ठोंबरे, विकास गुंडगे, पोपट रुपनवर, बाबासाहेब माने, नाना जाधव, विलास रुपनवर, शरद लोखंडे, राजेंद्र माने, तानाजी लिंगे, जयसिंह राजेमाने, तेजसिंह राजेमाने आदी
उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Bapu Mandle beat floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.