परळीतील बाप्पांना जाणार पुणे, मुंबईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:24 IST2021-09-02T05:24:15+5:302021-09-02T05:24:15+5:30

परळी : सज्जनगडच्या पायथ्याशी वसलेल्या परळीला रामाची परळी किंवा सज्जनगडची परळी नावाने ओळखले जाते. याबरोबरच आता गणरायाची परळी ...

Bappa from Parli will go to Pune, Mumbai | परळीतील बाप्पांना जाणार पुणे, मुंबईला

परळीतील बाप्पांना जाणार पुणे, मुंबईला

परळी : सज्जनगडच्या पायथ्याशी वसलेल्या परळीला रामाची परळी किंवा सज्जनगडची परळी नावाने ओळखले जाते. याबरोबरच आता गणरायाची परळी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. परळीतील गणेशमूर्तींना सातारा जिल्ह्याबरोबरच पुणे, मुंबईतून वाढली होत आहे.

परळी परिसरातील साठ गावांमध्ये फक्त कुंभारवाडा आहे. या कुंभारवाड्यातील मूर्तीकार आपल्या गावकीपुरते गणेशमूर्ती बनवत होते. कालांतराने त्यात बदल झाला. रेवली येथील श्रीरंग वाईकर यांचे कुटुंब परळीत आल्यानंतर त्यांनी गणपती कारखाना सुरू केला. हा कारखाना बाराही महिने सुरू असतो. त्याचे अनुकरण कुंभारवाड्यातील सर्व मूर्तीकारांनी घेऊन गावकीच्या भावकीच्या बाहेर जावून मोठ्या प्रमाणात मातीच्या, शाडूच्या, पीओपीच्या सुबक आकर्षक मूर्ती घडवायला सुरुवात केली.

एकदा गणपती मुूर्ती पाहणारा त्या गणेशमूर्तीच्या प्रेमातच पडतो. अशी सुबकता मूर्तीकारांच्या मूर्तीमध्ये असते.

परळीमध्ये सुमारे पंधरा ते वीस हजार मूर्ती बनविल्या जातात. या मूर्ती कारखान्यामध्ये परळी तसेच परिसरातील महिला, महाविद्यालयीन युवक-युवती तसेच बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. परळीसारख्या खेडेगावाला ही गणरायाच्या रूपाने एक बाजारपेठ निर्माण झाली आहे. परळी येथील गणरायाच्या मूर्तीचे स्टॉल सातारा, पुणे, मुंबई, वाशी, ठाणे या परिसरातील गेल्या दोन महिन्यांपासून लागले आहेत. घरगुती बाप्पांपासून ते भल्या मोठ्या मंडळाच्या गणपतीची मूर्तीही परळीमध्ये उपलब्ध आहेत. यामुळेच आता परळीला ‘गणरायाची परळी’ अशी ओळख निर्माण झाली आहे.

स्वत:चा नवीन व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन परळी येथील गणपती कारखान्यामध्ये बहुतांश ‘कमवा व शिका’ अशा योजनांतून शाळा महाविद्यालयातील युवक, युवती काम करण्यास येत असतात. नावीन्यपूर्ण गणपती तसेच त्याची सुबकता कशाप्रकारे असावी याकडे पाहिले जाते. बहुतांश कर्मचारी हे कला विकसित करून स्वत:चा गणपती कारखाना उभारणीकडे पाहतात तसेच ग्रामीण भागातील बेरोजगारांना ही रोजगार प्राप्त होण्यास मदत झाली.

३१परळी-गणेश

परळी खोऱ्यातील साठ गावांमधील कारागीर गणेशमूर्ती साकारण्यात मग्न आहेत.

Web Title: Bappa from Parli will go to Pune, Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.