शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: बनपेठेतील चिमुकले जपतायत सोंग काढण्याची परंपरा; कोयना भागात पारंपारिक पद्धतीने साजरा होतो शिमग्याचा सण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 19:31 IST

निलेश साळुंखे कोयनानगर: कोयना भागात शिमग्याचा सण पारंपारिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासणाला धुलिवंदना दिवशीची सोंग ...

निलेश साळुंखेकोयनानगर: कोयना भागात शिमग्याचा सण पारंपारिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासणाला धुलिवंदना दिवशीची सोंग काढण्याची परंपरा काळानुरुप लोप पावत असली तरी बनपेठ ता. पाटण येथील चिमुकल्यांनी मात्र ही प्रथा कायम राखली आहे.भारतीय संस्कृतीत सण उत्सवांची परंपराच आहे. ॠतुचक्र, निसर्ग बदल, फळ फुले पीकांसह शेतीच्या कामाला अनुसरूनच संस्कृतीशी नाते सांगणारे वेगवेगळे सण उत्सव मोठ्या उत्साहात व रीतिरिवाजाप्रमाणे साजरे  होत असतात. मराठी वर्षातील शेवट असणाऱ्या होळी (शिमगा) सणाला विशेष महत्त्व आहे. पाच दिवस चालणाऱ्या शिमग्याला (धुळवडीला) गावोगावी सोंग काढण्याची प्रथा अनेक वर्षांपासून प्रचलित आहे.होळी पासून रंगपंचमीपर्यत विविध खेळ व सोंग काढण्याची प्रथा रूढ होती. पुर्वी मनोरंजनाची साधन कमी असल्याने सण उत्सव यात्रा काळात आनंदोत्सव साजरे करताना ऐतिहासिक पौराणिक विनोदी प्रसंगातून विविध रूपात अबालवृद्धसोंग काढुन रात्रभर गावाच्या मुख्य चौकात किवा चावडीवर गावकऱ्यांचे मनोरंजन करताना पाहायला मिळायचे.परंतु सध्या आधुनिक अन् ऑनलाईनच्या जमान्यात वाढलेल्या इंटरनेट हस्तक्षेपाने मुलांसह प्रौढवर्गाला खीळवून ठेवले आहे. चौकाचौकातील गप्पांचे फड ओस पडुन खेळाच्या मैदानाऐवजी मोबाईलच्या स्क्रीनकडे टक लावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. परिणामी सण उत्सव व यात्रेतील विविध धार्मिक विधी, गाव बैठकीकडे लोक पाठ फिरवत असलेनं ते  काळाच्या ओघात लोप पावले का अशी शक्यता निर्माण झाली आहे. जुन्या चालीरिती, सण उत्सवाची परंपरा व संस्कृतीचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर