सामान्य व्यक्तीच्या विकासासाठी बँकांनी कार्यरत राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:08 IST2021-02-05T09:08:18+5:302021-02-05T09:08:18+5:30
: श्रीनिवास पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सर्व बँकांनी सामाजिक जबाबदारी समजून सर्वसामान्य व्यक्तीच्या विकासासाठी कार्यरत राहावे. ...

सामान्य व्यक्तीच्या विकासासाठी बँकांनी कार्यरत राहावे
: श्रीनिवास पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सर्व बँकांनी सामाजिक जबाबदारी समजून सर्वसामान्य व्यक्तीच्या विकासासाठी कार्यरत राहावे. तसेच पीक कर्जाचे वाटप १०० टक्के करावे, अशी सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली.
जिल्हा सल्लागार समितीची बैठक गुरुवारी नियोजन भवनात झाली. यावेळी खासदार पाटील बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, महाराष्ट्र बँकेचे उपअंचल प्रबंधक श्रीकृष्ण झेले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे यांच्यासह विविध बँकांचे व्यवस्थापक व प्रतिनिधी उपस्थित होते.
चालू वर्षासाठी ७ हजार ५०० कोटीचा पतपुरवठा प्राथमिक क्षेत्रासाठी अग्रणी बँकेने तयार केला आहे. त्यापैकी राष्ट्रीयीकृत, सहकारी तसेच खासगी बँकांद्वारे ५ हजार ५७१ कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला आहे. सर्व बँकांनी आपले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करा, असेही खासदार श्रीनिवास पाटील यांनी या बैठकीत सांगितले.
खरिपासाठी १ हजार ६८२ कोटी कर्ज वाटप केले असून, उद्दिष्टाच्या १०५ टक्के काम बँकांनी साध्य केले आहे, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या बैठकीत सांगितले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी राष्ट्रीय ग्रामीण जीवन उन्नती योजनेची माहिती देऊन सर्व बँकांनी योजनेंतर्गत यावर्षी बचत गटांना उद्दिष्टानुसार वित्त पुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
२८नियोजन
फोटो ओळ : सातारा येथील नियोजन समितीच्या सभागृहात खासदार श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.