बँक अकाउंट हॅक करून ४५ हजारांवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST2021-02-09T04:41:59+5:302021-02-09T04:41:59+5:30

सातारा : अज्ञाताने फोन करून ‘क्रेडिट कार्ड सुरू करा, पिन जनरेट करा,’ असे खोटे सांगून बँक अकाउंट हॅक करून ...

Bank account hacked to Rs 45,000 | बँक अकाउंट हॅक करून ४५ हजारांवर डल्ला

बँक अकाउंट हॅक करून ४५ हजारांवर डल्ला

सातारा : अज्ञाताने फोन करून ‘क्रेडिट कार्ड सुरू करा, पिन जनरेट करा,’ असे खोटे सांगून बँक अकाउंट हॅक करून तब्बल ४५ हजार ८९९ रुपयांवर डल्ला मारला. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर आयटीआय अ‍ॅक्ट व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, तक्रारदार हे सरकारी नोकरदार असून या घटनेने खळबळ उडाली आहे.

रामचंद्र बाबूराव घाडगे (वय ५८, रा. भोसले मळा, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून ते पाटबंधारे विभागात कार्यरत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, घाडगे यांना अनोळखी व्यक्तीचा फोन आला. ‘क्रेडिट कार्ड सुरू करा, पिन जनरेट करा,’ असे फोन करणाऱ्या अनोळखीने सांगितले. त्यावर तक्रारदार यांनी कोणतीही माहिती दिली नाही. असे असतानाही तक्रारदार यांच्या बँक खात्यातून वन प्लस स्टोअरवर ४५ हजार ८९९ रुपयांची खरेदी केल्याचा त्यांना मेसेज आला.

या घटनेनंतर तक्रारदार यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता खात्यातून पैसे गेल्याचे स्पष्ट झाले. बँक खाते हॅक करून पैसे काढल्याचे समोर आल्याने अज्ञाताविरुद्ध त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Bank account hacked to Rs 45,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.