शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Satara: विविध नावांची वेगवेगळे कागदपत्रे, भिलकटी येथे बेकायदा वास्तव्य करणारी बांगलादेशी महिला ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 14:08 IST

भिलकटी गावचे मतदान कार्ड..

फलटण : भिलकटी (ता. फलटण) येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असलेली बांगलादेशी महिला पोलिसांना आढळून आली. काटून एमएसटी एंजेला असे पासपोर्टवर त्या महिलेचे नाव असून, तिच्याकडे विविध नावांची वेगवेगळी कागदपत्रे मिळाली. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना जिल्हा विशेष शाखेकडून फलटण तालुक्यात व्हिसाची मुदत ८ जुलै २४ संपल्यानंतरही एक विदेशी महिला वास्तव करत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानंतर फलटण पोलिस भिलकटी येथे चौकशीसाठी गेले. त्यांना तेथे काटून एमएसटी एंजेला नावाची बांगलादेशी महिला हाजीर राजा साहब शेख (रा. निकमवस्ती, भिलकटी, ता. फलटण) या व्यक्तीसोबत राहत असल्याचे आढळून आले. त्या महिलेकडे कागदपत्रांची तपासणी करून अधिक माहिती घेतली असता तिच्याकडे सलमा काटून असे तेलंगणा राज्याचे आधार कार्ड आढळून आले.तिच्याकडे सलमा हाजीर शेख या नावाचे महाराष्ट्र राज्याचेही आधार कार्ड आढळून आले. त्याचबरोबर कुरेश मज्जिद फलटण (कुरेशनगर, ता. फलटण) यांच्याकडील निकाह प्रमाणपत्र आढळले. त्यावर ''दुल्हे का नाम हाजीर राजा साहब शेख (रा. निकम वस्ती, भिलकटी, ता. फलटण), तसेच दुल्हन का नाम सलमा हाजी मोहम्मद सरदार (रा. सोलापूर)'' असे आढळून आले.

जन्म तारखांमध्येही विसंगती..बांगलादेशाच्या पासपोर्टच्या झेरॉक्स प्रतीवर काटून एमएसटी एंजेला असे या महिलेचे नाव आढळले. ९ जुलै २०१९ ला काढलेल्या पासपोर्टची मुदत ८ जून २०२४ ला संपली आहे. या महिलेकडे बांगलादेशचे मतदान कार्डची कलर झेरॉक्स प्रतही सापडली आहे. तिच्याकडे सापडलेल्या पासपोर्ट, महाराष्ट्र राज्य आधार कार्ड व तेलंगणा राज्य आधार कार्ड यावर असलेल्या जन्म तारखेमध्ये विसंगती आढळून आली.

भिलकटी गावचे मतदान कार्ड..मुदत संपूनही व्हिसाचे नूतनीकरण न करता बेकायदेशीर व बिगरपरवानगीने भिलकटी येथे संबंधित महिलेचे वास्तव्य असल्याचे आढळले. त्या महिलेकडे भिलकटी (ता. फलटण) येथील मतदान कार्डही आढळून आले आहे. संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असे विविध ओळखपत्रे..

  • तेलंगणा राज्याचे आधार कार्ड
  • महाराष्ट्र राज्याचे आधार कार्ड
  • भिलकटी येथील मतदान ओळखपत्र
  • कुरेशीनगर (ता. फलटण) येथील निकाह प्रमाणपत्र

वेगवेगळी नावे..

  • बांगलादेशी पासपोर्टवर : काटून एमएसटी एंजेला
  • तेलंगणा आधार कार्ड : सलमा काटून
  • महाराष्ट्र आधार कार्ड : सलमा हाजीर शेख
  • निकाह प्रमाणपत्र : सलमा हाजी मोहम्मद सरदार