बनवडीची रामनवमीची यात्रा कोरोनामुळे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:39 IST2021-04-20T04:39:47+5:302021-04-20T04:39:47+5:30

कोपर्डे हवेली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बनवडी, ता. कऱ्हाड येथील यंदाची रामनवमी निमित्ताने होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. बनवडी ...

Banavadi's Ram Navami pilgrimage canceled due to corona | बनवडीची रामनवमीची यात्रा कोरोनामुळे रद्द

बनवडीची रामनवमीची यात्रा कोरोनामुळे रद्द

कोपर्डे हवेली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बनवडी, ता. कऱ्हाड येथील यंदाची रामनवमी निमित्ताने होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. बनवडी गावात रामनवमी निमित्ताने प्रत्येकवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा साजरी करण्यात येत असते. कोरोनाच्या महामारीमुळे ही यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. बुधवारी ही यात्रा होणार होती. मात्र, ग्रामपंचायतीने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून ग्रामस्थांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.

रेठरेच्या कोरोना लसीकरणाची पाहणी

कऱ्हाड : कोरोना लस घेतल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत चक्कर आल्याने १६ एप्रिल रोजी रेठरे बुद्रुक येथील संपत जाधव यांचा मृत्यू झाला होता. जिल्हा आरोग्य विभागाकडून जाधव यांचा मृत्यू कोरोना लस घेतल्याने झाला नसून तो अन्य कारणाने झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा लसीकरण विभागप्रमुख डॉ. प्रमोद शेळके यांनी रेठरे बुद्रुक आरोग्य केंद्रास भेट दिली. घडलेल्या घटनेची माहिती घेऊन त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. दरम्यान, आरोग्य केंद्राला लस उपलब्ध झाल्याने लसीकरणाला पुन्हा सुरुवात झाली असून ग्रामस्थांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त

कऱ्हाड : सध्या शेतकरी शेतीच्या मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. रब्बी हंगाम संपत आल्याने व कारखान्यांचा हंगाम संपल्याने अनेक ठिकाणी शेती रिकामी झाली असून त्या शेताची नांगरट करणे, कुळवट करणे तसेच शेतात शेणखत व कारखान्याकडून मिळणारे खत टाकून शेती तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून पाऊस पडलेल्या ठिकाणी मशागतीसाठी चांगला फायदा होत आहे. तसेच नांगरट करून मशागतीनंतर जमीन उन्हाने तापली की, खरीप हंगामातील पीक जोमात येते असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

शेरे येथे कोरोना लसीकरणाला प्रारंभ

कऱ्हाड : वडगाव हवेली प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने शेरे, ता. कऱ्हाड येथील जिल्हा परिषद शाळेत कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. सरपंच संगीता निकम यांच्या हस्ते लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, विकास सेवा सोसायटी अध्यक्षा अक्काताई निकम, उपसरपंच समीर निकम, किशोर निकम, राहुल पाटील, शहाजी पवार, तंटामुक्ती अध्यक्ष माणिकराव निकम, पोलीस पाटील मिलिंद पाटील, ग्रामविकास अधिकारी राजकुमार जाधव, सुकन्या गजबर, आरोग्य सेवक एस. एस. गायकवाड, आरोग्य सेविका एस. आर. सलगर उपस्थित होत्या.

Web Title: Banavadi's Ram Navami pilgrimage canceled due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.