शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात धबधबे, धोकादायक ठिकाणी पर्यटकांना प्रवेश बंदी करा; पालकमंत्र्यांची सूचना 

By नितीन काळेल | Updated: July 9, 2024 17:43 IST

'पोलिसांनी गस्त वाढवून हुल्लडबाजांवर कारवाई करावी'

सातारा : जिल्ह्याच्या काही भागात चांगला पाऊस सुरू आहे. पावसाळी पर्यटनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धबधबे, जलाशयासारख्या धोकादायक ठिकाणी ग्रामपंचायतींनी प्रवेश बंदीचे फलक लावावेत. सडावाघापूरसह इतर ठिकाणीही पोलिसांनी गस्त वाढवून हुल्लडबाजांवर कारवाई करावी, अशी स्पष्ट सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अतिवृष्टीतील उपायोजनांबाबत दूरदृश्यप्रणालीद्वारे यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ही सूचना केली. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.बैठकीत पालकमंत्री देसाई यांनी पावसाच्या काळात आवश्यक त्या ठिकाणी गरजेनुसार नागरिकांचे स्थलांतर करावे लागल्यास यंत्रणांनी सुरक्षित निवारे, पुरेसे अन्नधान्य, औषधसाठा याची तजबीज ठेवावी, अशी सूचना केली, तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जिल्ह्यात चांगल्या प्रकारे काम सुरू आहे. घरोघरी जाऊन पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा सातारा जिल्ह्याचा पॅटर्न अनेक जिल्ह्यांनी स्वीकारला आहे. या योजनेचे काम गतीने होण्यासाठी सर्व प्रांताधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा. शासनाने जारी केलेले अर्ज भरून घेण्यात यावेत, असेही स्पष्ट केले.जिल्हाधिकारी डुडी यांनी पावसामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. औषध व धान्याचा पुरेसा पुरवठा झालेला आहे. अतिवृष्टीमुळे स्थलांतराची वेळ आल्यास त्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट केले, तसेच त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन दररोज घेत आहेत. येत्या २१ दिवसांत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtourismपर्यटनShambhuraj Desaiशंभूराज देसाईPoliceपोलिस