शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत बामणोलीतील जवान शहीद, जावळी तालुक्यावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 12:51 IST

अतिशय कठीण परिस्थितीत कोरोना काळात सुद्धा या ध्येयवेड्या तरुणाने आपली जिद्द सोडली नाही. १४ मराठा बटालियन मध्ये जानेवारी महिन्यात प्रशिक्षण घेवून पहिल्याच पोस्टिंगवर जम्मू येथे देशसेवा करण्यासाठी ते रुजू झाले होते.

कुडाळ : जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे जवान प्रथमेश संजय पवार (वय २२) हे जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टर भागात सेवा बजावत असताना अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले. उद्या, रविवार त्यांचे पार्थिव बामणोली तर्फ कुडाळ येथे आणणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.  जवान प्रथमेश यांच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. वडील ट्रान्सपोर्ट व्यवसायात होते. प्रथमेश यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेरेवाडी, उच्च प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणोली तर माध्यमिक शिक्षण इंग्लिश स्कूल बामणोली येथे झाले.पहिलेच पोस्टिंग जम्मूतप्राथमिक शिक्षण घेत असताना देशसेवेची आवड त्यांना होती. धाडसी आणि करारी असलेले प्रथमेश आपल्या आई-वडिलांवर अत्यंत प्रेम करणारे आणि परिस्थितीची जाणीव असणारे होते. अतिशय कठीण परिस्थितीत कोरोना काळात सुद्धा या ध्येयवेड्या तरुणाने आपली जिद्द सोडली नाही. १४ मराठा बटालियन मध्ये जानेवारी महिन्यात प्रशिक्षण घेवून पहिल्याच पोस्टिंगवर जम्मू येथे देशसेवा करण्यासाठी ते रुजू झाले होते.कुटुंबांचा एकमेव आधारशहीद प्रथमेश हे कुटुंबांचा एकमेव आधार होते. यामुळे पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे़. सैन्य दलात दाखल झालेले प्रथमेश अविवाहित होते. त्यांच्या पश्चात वडील संजय महादेव पवार, आई राजश्री,, लहान भाऊ आदित्य असा परिवार आहे.               

टॅग्स :Satara areaसातारा परिसरjammu-pcजम्मूTerror Attackदहशतवादी हल्ला