शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली
2
वक्फ कायद्यात एक जरी चूक निघाली तरी खासदारकीचा राजीनामा देणार; जेपीसी अध्यक्षांची मोठी घोषणा
3
“जनतेला फसवणाऱ्या महायुती सरकारविरोधात लढाई तीव्र करणार”; मुंबई बैठकीत काँग्रेसचा निर्धार
4
महेश मांजरेकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर; मुक्ता बर्वे, काजोलचाही होणार सन्मान
5
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
6
"....म्हणून मी तिला देणार नाही घटस्फोट’’,  होणाऱ्या जावयासोबत पळाळेल्या महिलेच्या पतीनं सांगितलं कारण
7
कोकणची राणी होत Ratnagiri Jets मधून नव्या प्रवासाला निघाली स्मृती मानधना
8
मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर, ओटीटीवर सुपरफ्लॉप; 'छावा'ची नेटफ्लिक्सवर वाईट अवस्था
9
स्वारगेट प्रकरणात मोठी अपडेट..! आरोपी दत्ता गाडेविरोधात 893 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
10
५० कोटींचा 'तो' श्वान निघाला भारतीय जातीचा; ईडीने धाड टाकल्यावर मालकाने सगळेच सांगितले
11
उदयनराजे, उद्धव ठाकरेंच्या मागणीला संभाजीराजेंचे समर्थन; म्हणाले, “किल्ल्यांचे जतनही व्हावे”
12
रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका 'या' ३ गोष्टी; सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टचा मोलाचा सल्ला
13
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सच्या संघात 'मारिया शारापोवा'; MS Dhoni शी आहे खास कनेक्शन
14
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
15
"बलात्कार करायचा तर करा, पण, आमच्या पती, मुलांना सोडा…’’ मुर्शिदाबाद प्रकरणी कोर्टासमोर आली धक्कादायक माहिती   
16
Think Positive: स्वतःला आनंदी ठेवणे, हे आज मोठे आव्हान; जे AI ला सुद्धा जमणार नाही; पण... 
17
मुंबई पोलीस असल्याचे सांगून आमदाराला लुटण्याचा प्रयत्न; १२ तासांनी समोर आला खरा प्रकार
18
३६० अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्सची १५०० अंकांची झेप; 'ही' आहेत तेजीची ५ कारणे
19
IPL 2025: ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
20
रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..."

Satara: 'सह्याद्री'च्या निकालानंतर 'बॅलेट पेपर' पुन्हा चर्चेत!; रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचले, म्हणाल्या..

By प्रमोद सुकरे | Updated: April 10, 2025 12:24 IST

ईव्हीएम मशीन मतदान प्रक्रियेवर समाज माध्यमातून टिकेची झोड 

प्रमोद सुकरे कऱ्हाड: गत ४ महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीत सुमारे ४० हजारावर मतांनी पराभूत झालेल्या बाळासाहेब पाटीलांनी नुकत्याच झालेल्या सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय संपादन केला. त्यामुळे सध्या त्यांचे सर्वत्र अभिनंदन सुरू आहे. अशातच दुसरीकडे 'ईव्हीएम' मशीन वरील आक्षेप आणि 'बॅलेट पेपर' वरील मतदान पुन्हा चर्चेत आले आहे. सार्वजनिक निवडणुका देखील बॅलेट पेपरच झाल्या पाहिजेत अशा भावना आता समाज माध्यमातुन मोठ्या प्रमाणात व्यक्त होऊ लागल्या आहेत.खरंतर लोकसभा निवडणुकीत राज्यात सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील रोष व्यक्त करीत मतदारांनी आघाडीला चांगले यश दिले. साहजिकच आघाडीला चांगले वातावरण असल्याच्या चर्चा सुरू असतानाच काही महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्या. मात्र या निवडणुकीत महायुतीने मोठे यश मिळवले. या लाटेत कराड उत्तरेत देखील 'कमळ' फुलले. पण महायुतीला मिळालेल्या या यशामुळे पुन्हा 'ईव्हीएम' मशीन मतदानावरील शंका सुरू झाल्या. याबाबत काहीनी तर न्यायालयात धाव घेतली होती. थोडक्यात तेव्हापासून ईव्हीएम मशीन वरील शंका आणि बॅलेट पेपर वरील मतदानाची मागणी कमी जास्त प्रमाणात सुरूच आहे.नुकतीच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. त्यात बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आले. अन् विधानसभेला पराजित झालेल्या बाळासाहेब पाटलांची भाजपचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे व भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या दोन स्वतंत्र पॅनेलचा पराभव करीत मोठ्या फरकाने विजयी मिळविला. सह्याद्रीतील विजयानंतर झालेल्या विजय सभेमध्ये अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून बॅलेट पेपरवर हे मतदान झाले अन खरा निकाल लागला असे म्हणत विधानसभेच्या ईव्हीएम मशिन वरील मतदार बोट ठेवले.तर काहींनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत भाषणे केली.त्याला उपस्थितांनी टाळ्या, शिट्ट्या वाजवत दाद दिली. आता तोच धागा पकडत गेल्या ४ दिवसापासून समाज माध्यमातुन ईव्हीएम मशीनवर झोड उठवली जात आहे. तर बॅलेट पेपरवरच मतदान झाले पाहिजे अशा भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. आता यातून निष्पन्न काय होणार हे माहित नाही .पण बॅलेट पेपर वरील मतदान प्रक्रिया पुन्हा चर्चेत आली आहे हे मात्र नक्की.रोहिणी खडसेंचे ट्विट रोहिणी खडसेंनीही केले ट्विट सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुक निकालानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. त्यात खासदार रोहिणी खडसे या देखील आहेत.त्यांनी एक ट्विट केले आहे. त्यात 'चार महिन्यांपूर्वी ५० हजार मताधिक्याने जिंकलेला भाजपचा एक आमदार बॅलेट पेपरवर घेतलेल्या सह्याद्री कारखाना निवडणुकीमध्ये विजयी उमेदवारांच्या अर्धी मते पण घेऊ शकला नाही' असे म्हटले आहे. आता त्यांचे हे ट्विट देखील सध्या चर्चेचा विषय बनला आहे. 

गड राखल्याने चर्चा सुरूसहकारी संस्थातील निवडणुका या नेहमीच मतपत्रिकेवर झालेल्या आहेत. त्याच पद्धतीने सह्याद्री कारखान्याची ही निवडणूक झाली. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर सहकारी साखर कारखान्याची झालेली ही पहिलीच निवडणूक आहे. त्या निवडणुकीत शरद पवारांच्या शिलेदाराने गड राखल्याने या सगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडSugar factoryसाखर कारखानेBalasaheb Patilबाळासाहेब पाटीलBJPभाजपाElectionनिवडणूक 2024