बाळासाहेब भिलारे यांच्यामुळे मित्रच गमावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:42 IST2021-09-18T04:42:07+5:302021-09-18T04:42:07+5:30
पाचगणी : ‘बाळासाहेब भिलारे हे माझे सख्खे शेजारी आणि सच्चा मित्र होते. ते गेल्याने जिवाभावाचा मित्र गेल्याची भावना होत ...

बाळासाहेब भिलारे यांच्यामुळे मित्रच गमावला
पाचगणी : ‘बाळासाहेब भिलारे हे माझे सख्खे शेजारी आणि सच्चा मित्र होते. ते गेल्याने जिवाभावाचा मित्र गेल्याची भावना होत आहे,’ अशा भावना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे यांच्या निधनानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भिलार येथे येऊन बाळासाहेब भिलारे यांचे चिरंजीव नितीन भिलारे आणि जतीन भिलारे व कुटुंबियांची भेट घेतली तसेच त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
मंत्री शिंदे म्हणाले, ‘विकासाची गंगा आमच्या दुर्गम भागात पोहोचवणाऱ्या एका विकास पुरुषाला आपण मुकलो आहोत. दादांनी आमच्या जलाशयापलीकडील गावांना बोट, तराफा तसेच रस्ते या दळणवळणाच्या सोयी पुरवल्याने आम्ही आमच्या गावाला लगेच पोहोचू शकतो. दादांनी आमच्या गावाला रस्ता केला. त्यामुळे आम्ही आमच्या गावाला सोयीस्करपणे जाऊ शकतो. दादांचे गावावरचे उपकार कधीही विसरू शकणार नाही.’
यावेळी सभापती संजय गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, प्रवीण भिलारे, सरपंच शिवाजी भिलारे, शशिकांत भिलारे, अनिल भिलारे, अमोल भिलारे, राजेंद्र भिलारे, आनंदा भिलारे उपस्थित होते.
सोबत
१७पाचगणी
भिलार येथे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत बाळासाहेब भिलारे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी नितीन भिलारे, जतीन भिलारे, प्रवीण भिलारे उपस्थित होते.