शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

‘बक्कळ नगं’.. सरासरीएवढा पडला तरी पुरे!

By admin | Updated: June 28, 2016 00:33 IST

शेतकऱ्यांपुढे चिंता : महिन्यात केवळ एकूण १२३६ मिलीमीटर पावसाची नोंद; प्रतीक्षा दमदार पावसाची

सचिन काकडे --सातारा  जिल्ह्यात मान्सून उशिरा का होईना सक्रिय झाल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, एक जूनपासूून आजअखेर जिल्ह्यात केवळ १२३६ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. मान्सूनचे उशिरा आगमन आणि कमी पर्जन्यमान पाहता यंदा तरी पाऊस सरासरी गाठणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.सातारा जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान सुमारे ८ ते ९ हजार मिलीमीटर इतके आहे. जून महिन्यात चांगला पाऊस झाला तरच पाऊस सरासरी गाठतो. मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे वेगळेच चित्र निर्माण झाले. मान्सून वेळेवर म्हणजे २ ते ५ जूनपर्यंत दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता; परंतु प्रत्यक्षात मान्सून २० जूननंतर सक्रिय झाला. एक जूननंतर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. तर दुष्काळी माण-खटाव तालुक्यांवर पावसाने कृपादृष्टी दाखविली आहे.याठिकाणी झालेल्या पावसामुळे बंधाऱ्यांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला. तसेच शेतकऱ्यांची पेरण्यांची कामेही सुरू झाली. मात्र, जिल्ह्यात इतर ठिकाणी पावसाने पाठ फिरवली. २० जूननंतर जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असला तरी अजून कुठेही दमदार पाऊस झाला नाही. एक जूनपासून आजअखेर सर्वात कमी ६६.८ मिलीमीटर पाऊस वाई तालुक्यात झाला असून, यानंतर सातारा तालुक्यात ६७.९ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आजअखेर १२३६ मिलीमीटर पाऊस झाला असून, पावसाची सरासरी ११२.४ इतकी आहे. सातारा परिसरात अजून पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यातच परिसरात अजूनही पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. कास धरणाची पाणी पातळी खालावल्याने शहरात एक दिवस पाणी कपात सुरू आहे. महाबळेश्वरला सर्वाधिकमहाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात एक जूनपासून आजअखेर सर्वाधिक २४९.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी तालुक्यात सरासरी इतकाही पाऊस झाला नव्हता. जून महिना कोरडा गेल्याने पाऊस गेल्या वर्षाची पुनरावृत्ती करणार की सरासरी गाठणार, याचे उत्तर पावसावरच अवलंबून आहे.माण-खटाववर कृपादृष्टीपावसाचे आगमन पश्चिमेकडून होते हा इतिहास असला तरी यंदा मान्सूनने प्रथमच पूर्वेकडून हजेरी लावली. पूर्वेकडील माण-खटाव हे तालुके दुष्काळी म्हणून संबोधले जातात. पावसाने या ठिकाणी दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. खटाव तालुक्यात आजअखेर १३९.३ मिमी तर माण तालुक्यात १४५.५ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.कोयनेत ७.०७ टीएमसीजिल्ह्यात लहान-मोठी जवळपास १५ धरणे आहे. यातील कोयना हे सर्वांत मोठे धरण आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता असणाऱ्या या धरणात आजमितीस केवळ ७.०७ टीमएसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. आता धरण भरण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.