शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाघांच्या शिकारीसाठी वापरला जाणारा ‘बहेली’ सापळा कऱ्हाडच्या शिवारात!, परप्रांतीय शिकारी टोळ्या करतात वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 16:45 IST

कसा असतो ‘बहेली’ सापळा?..जाणून घ्या

संजय पाटीलकऱ्हाड (सातारा) : खोडशी आणि त्यानंतर शहापूरच्या शिवारात परप्रांतीय शिकारी टोळ्या वापरत असलेला ‘बहेली’ प्रकारचा सापळा आढळला. बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांसाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल. ‘बहेलिया’ आणि ‘बावरिया’ शिकारी टोळ्या प्रामुख्याने वाघांच्या शिकारीसाठी ‘बहेली’ सापळा वापरतात; पण कऱ्हाडात हे सापळे आलेच कसे आणि कोणत्या उद्देशाने ते शिवारात लावले गेले, हा खरा प्रश्न आहे.खोडशीच्या शिवारात ७ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘बहेली’ प्रकारचा सापळा आढळला होता. त्यावेळी या सापळ्यात एक बिबट्या अडकला होता. संबंधित बिबट्याची सुखरूप सुटका झाली खरी; पण त्या गुन्ह्याच्या तपासात वन विभागाच्या हाती जास्त काही लागले नाही. संबंधित गुन्ह्यात एका स्थानिकाला ताब्यात घेतले होते. मात्र, त्याने तो सापळा ज्याच्याकडून घेतला ती व्यक्ती त्यावेळी हयात नव्हती. त्यामुळे वन विभागाच्या तपासाची कडी त्याच ठिकाणी खंडित झाली.त्यानंतर पुन्हा एकदा दोन दिवसांपूर्वी २८ जुलै रोजी तसाच सापळा शहापूरच्या शिवारात आढळला. यावेळी सापळ्यात चुकून एक श्वान अडकला होता. त्या श्वानाचीही सुखरूप सुटका झाली. मात्र, परप्रांतीय शिकारी टोळ्या वापरत असलेले हे ‘बहेली’ सापळे कऱ्हाडच्या शिवारात येतात कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कसा आहे हा ‘बहेली’ सापळा?

  • ‘बहेली’ सापळा हा साखळी व पूर्णपणे लोखंडापासून बनवलेला असतो.
  • दीड ते दोन फूट साखळीला पुढे चिमटा तयार करण्यात आलेला असतो.
  • वन्यप्राण्याचा पाय पडला की चिमटा सुटून त्यामध्ये प्राण्याचा पाय अडकतो.
  • पाय सोडविण्यासाठी प्राणी जेवढी धडपड करेल तेवढा तो चिमटा पायात रुतून घट्ट होत जातो. 

बहेलिया, बावरिया शिकारी टोळ्यामध्य प्रदेशातील ‘कटनी गँग’ म्हणून ‘बहेलिया’ या शिकारी टोळीला ओळखले जाते. तसेच पंजाब, हरयाणा, राजस्थानमध्ये ‘बावरिया’ ही शिकारी टोळी कार्यरत आहे. या दोन्ही टोळ्या ‘बहेली’ सापळा वापरतात. प्रामुख्याने वाघांची शिकार या दोन्ही टोळ्यांकडून केली जाते. सध्या या दोन्ही टोळ्या क्रियाशील आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTigerवाघforest departmentवनविभाग