बाबूराव कार्वेकर यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST2021-06-06T04:28:47+5:302021-06-06T04:28:47+5:30
कऱ्हाड : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी बाबूराव कार्वेकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. सरपंच सुवर्ण ...

बाबूराव कार्वेकर यांचा सत्कार
कऱ्हाड : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी बाबूराव कार्वेकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. सरपंच सुवर्ण कापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. तलाठी विशाल पाटील, ग्रामविकास अधिकारी शरद बागडे यांची यावेळी उपस्थिती होती.
वेणूताई चव्हाण यांना अभिवादन (फोटो : ०५केआरडी०३)
कऱ्हाड : येथील वेणूताई इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये वेणूताई चव्हाण यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मान्यवरांनी वेणूताईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्याहस्ते वेणूताईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी अभिवादन करीत वेणूताईंच्या कार्याला उजाळा दिला. मुख्याध्यापिका एम. बी. कुंभार, पूर्व प्राथमिकच्या प्रमुख एम. व्ही. विभूते यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
कऱ्हाडात व्याख्यानास प्रतिसाद
कऱ्हाड : येथे वेणूताई चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त वाय. बी. चव्हाण स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक डॉ. बी. एन. गोफणे यांचे ऑनलाइन व्याख्यान झाले. व्याख्यानास प्रतिसाद मिळाला. अध्यक्षस्थानी प्रकाश पाटील होते. प्राचार्य डॉ. जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. माळी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार यांनी आभार मानले. एस. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
अनिल वायचळ यांचा गौरव
तळमावले : वायचळवाडी (ता. पाटण) येथील अनिल वायचळ यांनी चक्रीवादळात दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांचा संजीवन प्रतिष्ठान व नवभारत संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, माजी पंचायत समिती सदस्य शंकरराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. अशोक देसाई, उदय चव्हाण, यशवंत देसाई, माणिकराव देसाई, हनुमंत देसाई, लाला देसाई, रमेश गुरव, वसंतराव पतंगे, माणिक खटावकर, सुनील धर्माधिकारी, प्रा. सचिन पुजारी उपस्थित होते.
बाळकृष्ण मोरे यांचा सत्कार
कऱ्हाड : येवती (ता. कऱ्हाड) येथे ग्रामीण डाक सेवक म्हणून ४५ वर्षे सेवा करणारे बाळकृष्ण मोरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. डाक अधिकारी संजय सुतार, विभागीय अधिकारी महेश माळी, अशोक भावके, समाधान गायकवाड, बाबासाहेब मदने, मोहन गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.