सातारा-कऱ्हाडात अखेर जमलं ‘बाबा’
By Admin | Updated: August 6, 2015 21:36 IST2015-08-06T21:36:39+5:302015-08-06T21:36:39+5:30
परिवर्तनाचे वारे : माजी मुख्यमंत्र्यांच्या गटाचे प्रथमच स्पष्ट अस्तित्व; शिवेंद्रसिंहराजेंनी जिंकले विरोधकांच्या ताब्यातील मोक्याचे गड

सातारा-कऱ्हाडात अखेर जमलं ‘बाबा’
वाई : वाई तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यापैकी २५ ग्रामपंचायती बिनविरोध होऊन तीन ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले. उर्वरित ४२ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी यांना समिश्र यश मिळाल्याचे चित्र पाहावयास मिळाले़ या ग्रामपंचायत निवडणूक पक्षीय निवडणुकीपेक्षा स्थानिक मुद्दे व गटातटाच्या वर निवडणुका लढवल्या गेल्या़तालुक्यातील अनेक गावांत काँग्रेस व राष्ट्रवादी दोन गटांत स्थानिक पातळीवर झाल्या. सरपंच निवडीत अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे़ तर काही पॅनेल एका पक्षाचे; परंतु सरपंचपदाचे उमेदवार दुसऱ्या पक्षाचे निवडून आले आहेत, त्यामुळे ‘गड आला सिंह गेला,’ अशी परस्थिती निर्माण झाली आहे़ आसले, ता़ वाई येथील ग्रामपंचायत निवडणुकीत माधवराव निगडे यांची ही बारावी ग्रामपंचायत निवडणूक लढविली असून ५५ वर्षे ग्रामपंचायत सदस्य होण्याचा बहुमान मिळविला असून, ‘लिमका बुक’ मध्ये नोंद झाली आहे़निवडणुकी विजयी गावनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे : बावधन - सदाशिव ननावरे, सुलोचना कुंभार, सतीश पिसाळ, रोहिणी ननावरे, संतोष राजेभोसले, अमोल जाधव, नलिनी भोसले, आशा भोसले, लता चव्हाण, तानाजी कचरे, दिलीप कांबळे, नीता लावंड, तानाजी पिसाळ, हेमलता देवकाते, निर्मला कदम, अजित पिसाळ. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीला चिखलीत धक्का
शेंदूरजणे, आसले येथे सतांतर झाले असून, चिखली ग्रामपंचायतीत बापूसाहेब शिंदे व विकास शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने बाजी मारत नऊ जागा जिंकून राष्ट्रवादीला धक्का दिला आहे़ तर बावधनमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी पुरकृत पॅनेलमधून दिलीप कांबळे व तानाजी कचरे हे निवडून आले आहेत़