सुधीर कुंभार यांना पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:25 IST2021-06-29T04:25:39+5:302021-06-29T04:25:39+5:30

कऱ्हाड : ढेबेवाडी (ता. पाटण) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विज्ञान शिक्षक डॉ. सुधीर कुंभार यांना मराठी विज्ञान परिषदेच्यावतीने ...

Award to Sudhir Kumbhar | सुधीर कुंभार यांना पुरस्कार प्रदान

सुधीर कुंभार यांना पुरस्कार प्रदान

कऱ्हाड : ढेबेवाडी (ता. पाटण) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विज्ञान शिक्षक डॉ. सुधीर कुंभार यांना मराठी विज्ञान परिषदेच्यावतीने देण्यात येणारा यावर्षीचा ‘राज्यस्तरीय विज्ञान प्रसार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र आणि पंचवीस हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

विज्ञान प्रसारासाठी समाजात सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तीला सुधाकर आठले यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. नुकताच हा पुरस्कार वितरण सोहळा ऑनलाईन पद्धतीने पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठराज जोशी होते. यावेळी वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अरविंद रानडे, ए. पी. देशपांडे, जयंत जोशी आदी उपस्थित होते. पुरस्काराबद्दल रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, डॉ. व्ही. एस. शिवणकर, डॉ. प्रतिभा गायकवाड, संजय नागपुरे, शिवलिंग मेनकुदळे, कमलाकर महामुनी, मनेर जाधव, प्राचार्य साठे तसेच विज्ञान अध्यापक संघ व एम. एन. रॉय संस्थेच्यावतीने सुधीर कुंभार यांचा सत्कार करण्यात आला.

फोटो : २८ सुधीर कुंभार

Web Title: Award to Sudhir Kumbhar