शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

ZP Election: सातारा जिल्ह्यात झेडपीच्या एका गटासाठी सरासरी ३३,७१३ मतदार; सर्वाधिक गटांची संख्या कोणत्या तालुक्यात..वाचा

By नितीन काळेल | Updated: November 28, 2025 15:41 IST

निवडणूक आयोगाकडील माहिती : ६५ गट अन् पंचायत समितीच्या १३० गणांसाठी निवडणूक

नितीन काळेलसातारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लवकरच होत असल्याने सातारा जिल्ह्यातील एकूण ६५ गट आणि १३० गणांसाठी मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यात एकूण २१ लाख ९१ हजारांवर मतदार राहणार आहेत. यामध्ये राज्य निवडणूक आयोगाकडील माहितीनुसार एका गटासाठी सरासरी ३३ हजार ७१३ मतदार राहणार आहेत.राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मुदत संपून पावणेचार वर्षे होऊन गेली आहेत. सध्या या संस्थांवर प्रशासकीय राजवट आहे. आता तब्बल पावणेनऊ वर्षांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचीही निवडणूक होत आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांची अंतिम रचनाही झाली आहे. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतींसह गट आणि गणांचेही आरक्षण निश्चित झाले आहे. आता फक्त निवडणुकीची घोषणा होणे बाकी आहे.

कराड तालुक्यात सर्वाधिक १२ गट..सातारा जिल्हा परिषदेसाठी एकूण ६५ गट आहेत. सर्वाधिक गटांची संख्या कराड तालुक्यात १२ आहे. तर महाबळेश्वर तालुक्यात फक्त दोनच गट आहेत. तर पंचायत समितीचे १३० गण आहेत. या गट आणि गणांतील मतदारांची संख्या प्रारूप यादीनुसार प्रशासनाकडून समोर आलेली आहे. यामध्ये एकूण २१ लाख ९१ हजार ३७४ मतदार आहेत.

पुरुष मतदार ११ लाखांवर...जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वाधिक मतदारांची संख्या पुरुषांची आहे. प्रारूप मतदार यादीनुसार ही संख्या ११ लाख ११ हजार ८५४ इतकी आहे. तर महिला मतदारांची संख्या १० लाख ७९ हजार ४६० आहे. त्याचबरोबर इतर मतदारांची संख्या ६० आहे.

तालुकानिहाय गट अन् गण संख्या

  • महाबळेश्वर - ०२ - ०४
  • वाई - ०४ - ०८
  • खंडाळा - ०३ - ०६
  • फलटण - ०८ - १६
  • माण - ०५ - १०
  • खटाव - ०७ - १४
  • कोरेगाव - ०६ - १२
  • सातारा - ०८ - १६
  • जावळी - ०३ - ०६
  • पाटण - ०७ - १४
  • कराड - १२ - २४

१७ ते ४३ हजारांपर्यंत मतदार एका गटात...सातारा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार पाटण तालुक्यातील एका गटात सर्वाधिक मतदार आहेत. तर सर्वात कमी मतदार संख्या महाबळेश्वर तालुक्यातील गटात राहणार आहे. जिल्ह्यातील गटांतील मतदारांचा विचार करता १७ हजार ते ४३ हजारांपर्यंत एका गटात मतदार राहणार आहेत.

सातारा जिल्हा आठव्या स्थानी...निवडणूक आयोगाकडील माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या एका गटासाठी सातारा जिल्ह्यात ३३ हजार ७१३ मतदार असतील. तर राज्यात बीडमध्ये सर्वाधिक ५७ हजार ५६७, पुणे जिल्हा ४० हजार ८३३ मतदार राहणार आहेत. या यादीत सातारा जिल्हा आठव्या स्थानी असणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara ZP Election: Karad Taluka has Maximum Groups, Voters Per Group 33,713

Web Summary : Satara Zilla Parishad election nears with 21.91 lakh voters across 65 groups. Karad Taluka has the most groups (12). Each group averages 33,713 voters, with male voters exceeding females. Voter count per group ranges from 17,000 to 43,000, placing Satara eighth in the state.