शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
5
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
6
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
7
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
8
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
9
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
10
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
11
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
12
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
13
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
14
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
15
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
16
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
17
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
18
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
19
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
20
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...

लेखकावर गवंड्याच्या हाताखाली काम करण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 17:02 IST

उंब्रज : ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बाबा कदम यांनी लिहिलेल्या पुस्तकांनीच मला लिहिण्याची प्रेरणा दिली. ३ कादंबºया, ३ कथासंग्रह, १ चरित्र लिहिले. हे सांगणाºया कºहाड तालुक्यातील मरळी येथील लेखक शंकर कवळे यांच्या ‘माणुसकीचा मोठेपणा’ या कथासंग्रहातील माणुसकी आणि मोठेपणा ही कथा चौथीच्या मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात घेण्यात आली आहे.

ठळक मुद्दे कथा शंकर कवळे यांच्या ‘माणुसकी’च्या मजुरीची ! पाठ्यपुस्तकात कथेचा समावेश दरवर्षी मानधन मिळणार आहे ते फक्त दोनशे रुपये.

उंब्रज : ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बाबा कदम यांनी लिहिलेल्या पुस्तकांनीच मला लिहिण्याची प्रेरणा दिली. ३ कादंबºया, ३ कथासंग्रह, १ चरित्र लिहिले. हे सांगणाºया कºहाड तालुक्यातील मरळी येथील लेखक शंकर कवळे यांच्या ‘माणुसकीचा मोठेपणा’ या कथासंग्रहातील माणुसकी आणि मोठेपणा ही कथा चौथीच्या मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात घेण्यात आली आहे.

दरम्यान, माणुसकी आणि मोठेपणा ही कथा लिहिणारा हा लेखक आज दोनवेळची घरातील चूल पेटविण्यासाठी गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणून राबत आहे. दुसºयाचा शेतात मजूरी करतोय. उद्याचा दिवस चांगला उगवेल आणि माझे लेखन पुन्हा सुरू होईल, या आत्मविश्वासाने आज परिस्थितीशी झगडत आहे, याकडे कोणाचेच लक्ष नाही.

   कºहाड तालुक्यातील मरळी हे छोटे खेडेगाव. खंडोबाच्या पाली या गावापासून ३ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या गावात शंकर दिनकर कवळे यांचा जन्म झाला. वडील दिनकर हे दोरखंड वळायचे काम करत, तर आई शकुंतला शेतमजुरी करायची. ५ भाऊ, ३ बहिणी असा मोठा परिवार. १ गुंठा जमीन नाही. गरीबी पाचवीला पुजलेली. पण शंकर यांना शिकायचं होतं. घरच्या आर्थिक परिस्थितीशी झगडत त्यांनी १२ वी पर्यंत शिक्षण घेतले आणि शेवटी परिस्थिती पुढे हार पत्करली. दुगलीवरची गाई घेऊन तिला चरण्यासाठी डोंगर गाठू लागले. पण काही तरी शिकायचेच ही इच्छा गप्प बसू देत नव्हती.  मोठ्या भावाने आणलेली लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, बाबा कदम यांची पुस्तके ते डोंगरात बसून वाचू लागले आणि हीच पुस्तके त्यांच्या लेखणीला प्रेरणादायी ठरली.

हुंडाविरोधी ‘आरती’, प्रेम कसे असावे सांगणारी ‘अनुराग’ आणि ग्रामीण भागातील वास्तव सांगणारी ‘बिजली’ या ३ कादंबºया अस्तित्वात आल्या. माणुसकीचा मोठेपणा, खरा माणूस, बुद्धीमान बिरबल हे कथासंग्रह तयार झाले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र त्यांनी लिहिले.

लेखक शंकर कवळे सांगतात, मी लिखाणास सुरुवात केली की तहान, भूक हरपते. फक्त लिखाणच सुरू होते. हे सर्व लिखाण मी गावातील ज्योतिबाच्या देवळाच्या गाभाºयात बसून केले आहे. घर अपुरे, त्यामुळे देवळच घर होते. गाभाराच लिखाणाची खोली बनवली. लिहिलेले लिखाण प्रकाशित करण्यासाठी खूप ठेचा खाल्या. अल्प मानधनात वितरकांना हक्क दिले. पण पुस्तके प्रकाशित केली. मला अधिकाधिक मानधन मिळाले ते म्हणजे चार हजार रुपये. हीच आतापर्यंतची अधिकची कमाई.

          आज शंकर कवळे हे दहा बाय दहाच्या खोलीत राहतात. पावसाने ओले झालेल्या या खोलीत शंकररावांच्या माणुसकीचा मोठेपणापासून इतर सर्व पुस्तके पाहताना, वाचताना मन मात्र ओलेचिंब होऊन जाते. प्लास्टिकच्या पिशवीतून ते एक एक पुस्तक बाहेर काढत होते. त्यांची वास्तववादी लिखाणाची शैली मनाला भुरळ पाडत होती.

बोलत बोलत शंकरराव स्वत:च्या आयुष्याच्या पुस्तकाचे एक एक पान उलघडू लागले. लग्न उशिरा झाले, लग्न करून घरात आल्यानंतर पत्नी पूनम या दुसºयाच्या शेतात शंकररावांच्या बरोबर मजुरी करण्यास जाऊ लागल्या. ते आज अखेर सुरूच आहे. पण, पती लेखक आहेत याचा मात्र त्यांना नितांत अभिमान आहे. शंकररावांची मुलगी कादंबरी सद्या ७ वीत शिकतेय आणि मुलगा विश्वम हा दीड वर्षाचा आहे.

कादंबरी घरातच होती म्हणून सहज विचारले. शाळेत का गेली नाही.तर शंकरराव बोलले आजारी आहे, दवाखान्यात न्यायची आहे. पण, पैसे नाहीत म्हणून नेली नाही. उद्या नेणार आहे. एवढी विदारक परिस्थिती दिसून आली. पण अजूनही शंकरराव खचले नाहीत. घराकडे पाहून म्हणाले, घरकुल मिळतंय पण जागा नाही. पण बघू, अजून खूप लिहायचे आहे, पण वेळ मिळत नाही. सर्व वेळ जगण्यासाठीच्या कमाई वर जातोय.

पाठ्यपुस्तकात तुमची कथा कशी काय प्रसिध्द झाली, या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, एका मासिकात लोकशाहीत वागावं कसं? हा मी लिहिलेला लेख प्रसिध्द झाला होता. हा लेख वाचून जयसिंगपूरचे प्रा. जगन्नाथ गवळी यांनी संपर्क साधला. माझे सर्व लिखाण त्यांनी वाचले आणि कथासंग्रह पाठ्यपुस्तक महामंडळाकडे पाठवून देण्यास सांगितले. मी वर्षापूर्वी कथासंग्रह पाठवून दिला आणि महामंडळाने माझी कथा चौथीच्या मराठी माध्यमाच्या पुस्तकासाठी निवडली आणि प्रसिद्ध केली .याबाबत मला दरवर्षी मानधन मिळणार आहे ते फक्त दोनशे रुपये.शंकरराव सांगतात, माझा गावात कोणी मित्र ही नाही आणि शत्रू ही. मी आणि कुटुंब यापुरताच मर्यादित असतो. अजून खूप लिखाण करायचं आहे. जे डोक्यात आहे ते लेखणीतून उतरण्यासाठी मला वेळ पाहिजे. हा वेळ मिळण्यासाठी मला जगण्याच्या लढाईतून उसंत मिळणे गरजेचे आहे. शंकररावांना ही उसंत मिळण्यासाठी, त्यांची लेखणी पुन्हा परजण्यासाठी शासन, समाजसेवी संघटना आणि वाचक यांच्याकडून आर्थिक मदतीचा हात मिळेल का हा प्रश्न आहे.        

    शंकर कवळे यांनी आरती ही कादंबरी लिहिली त्याची एकच प्रत त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ही कादंबरी ते इतरांना वाचण्यासाठी देऊ ही शकत नाहीत. त्यांची प्रसिद्ध झालेलीे सर्व पुस्तके त्यांनी नाममात्र मानधन घेऊन वितरकांना सर्व हक्कासह दिली आहेत. काहींचे मानधन ही मिळालेले नाही. शंकर कवळे लिखित पुस्तके मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपºयात वितरीत झाली आहेत. हे त्यांना वाचकांनी पाठवलेल्या पत्रांच्यामुळे लक्षात येते. चंद्रपूर जिल्ह्यातील सोनेगाव (बिगूर) येथील लीना ढोणे या पत्रातून लिहितात, ‘तुमची सर्व पुस्तके वाचली. तुमची पुस्तके वाचत असताना वाटते समोर जणू काही नाटकच सुरू आहे, असा भास होत होता. अशी आलेली पत्रे कवळे यांच्या लेखनशैलीची खासियत निदर्शनास आणून देताना दिसून येतात.