औंधच्या आश्रमशाळेने नावलौकिक उंचावला- माध्यमिक आश्रमशाळेस सदिच्छा भेट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:25 IST2021-06-19T04:25:59+5:302021-06-19T04:25:59+5:30

औंध : औंध येथील माध्यमिक आश्रमशाळेचा दर्जा व नावलौकिक चांगला असून, अशाचप्रकारे दर्जा राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन ...

Aundh's Ashram School rises to fame - Goodwill visit to Madhyamik Ashram School. | औंधच्या आश्रमशाळेने नावलौकिक उंचावला- माध्यमिक आश्रमशाळेस सदिच्छा भेट.

औंधच्या आश्रमशाळेने नावलौकिक उंचावला- माध्यमिक आश्रमशाळेस सदिच्छा भेट.

औंध : औंध येथील माध्यमिक आश्रमशाळेचा दर्जा व नावलौकिक चांगला असून, अशाचप्रकारे दर्जा राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन सातारा समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले.

औंध येथील माध्यमिक आश्रमशाळेला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजाराम देशमुख, मुख्याध्यापक दडस यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

नितीन उबाळे म्हणाले, विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने चांगल्याप्रकारचे शिक्षण देण्यासाठी नियोजन करावे. शालेय परिसर स्वच्छ ठेवून सभोवताली वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनही करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

फोटो : १८ रशीद शेख

औंध येथील माध्यमिक आश्रमशाळेला समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी भेट दिली. यावेळी राजाराम देशमुख व शिक्षक उपस्थित होते. (छाया : रशिद शेख)

Web Title: Aundh's Ashram School rises to fame - Goodwill visit to Madhyamik Ashram School.