शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: औंध पोलिस स्टेशन सलग दहाव्या जिल्हा पुरस्काराने सन्मानित, सर्वोत्कृष्ट प्रकटीकरण पुरस्कार

By दीपक शिंदे | Updated: March 18, 2023 14:22 IST

विविध घटनांमधून बारकाईने तपास करून अनेक चोरीच्या घटनांचा छडा लावून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

औंध : औंध पोलिस ठाणे जिल्ह्यात अव्वल ठरले आहे. विविध घटनांमधून बारकाईने तपास करून अनेक चोरीच्या घटनांचा छडा लावून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असल्याने सलग दहाव्या जिल्हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे औंध पोलिस ठाण्याची मान उंचावली आहे. शुक्रवारी सर्वोत्कृष्ट प्रकटीकरण पुरस्कार जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.फेब्रुवारी महिन्यात चोराडे फाटा येथे झालेल्या लूटमार प्रकरणात चोरट्यांचा छडा लावून १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला, तसेच केबल चोरी प्रकरणात नाकाबंदी करून आरोपीस ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला व या गुन्ह्यासह एकूण चोरीचे ८ गुन्हे उघडकीस आणले. यामध्येही सर्वच्या सर्व मुद्देमाल हस्तगत केला.चोराडे फाटा येथे झालेल्या जबरी चोरीमध्ये आरोपींनी कोणताही पुरावा मागे सोडला नसल्याने तपासात अनेक अडचणींचा सामना करीत सलग एक महिना प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासून सदरचा क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळविले. त्याबद्दल सर्वोत्कृष्ट प्रकटीकरण पुरस्कार जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी औंध पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलिस नाईक प्रशांत पाटील, किरण जाधव, महेश जाधव आदीसह कर्मचारी उपस्थित होते. या गौरवास्पद कामगिरीबद्दल औंध पोलिसांचे परिसरातील ग्रामस्थ, सरपंच, पोलिस पाटील, पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

औंध पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी धडपडत असतो. या भागातील क्राइम रेट कमी करण्यासाठी आमचा जिल्हा पोलिस अधीक्षक व अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहे. काम करीत असताना शाबासकीची थाप मिळाली की बळ मिळते. - दत्तात्रय दराडे -सहायक पोलिस निरीक्षक औंध.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस