औंधच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली चंद्रकांत पाटील यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:44 IST2021-09-15T04:44:33+5:302021-09-15T04:44:33+5:30

औंध : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची औंध येथील ग्रामपंचायत सदस्य वसंतराव पवार, पोपट कुंभार, गणेश चव्हाण यांनी व ...

Aundh office bearers met Chandrakant Patil | औंधच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली चंद्रकांत पाटील यांची भेट

औंधच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली चंद्रकांत पाटील यांची भेट

औंध : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची औंध येथील ग्रामपंचायत सदस्य वसंतराव पवार, पोपट कुंभार, गणेश चव्हाण यांनी व ग्रामस्थांनी भेट घेऊन औंधसह परिसरातील विविध अडचणी, समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.

यावेळी वसंत पवार व गणेश चव्हाण यांनी औंध परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा, यासाठी केंद्रातील भाजप सरकारच्या माध्यमातून उद्योगधंदे सुरू करावेत, शेती पाण्याचा प्रश्न सोडवावा तसेच वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली.

यावेळी औंधच्या जगदंबा परिवर्तन पॅनेलच्या शिष्टमंडळाने चंद्रकांत पाटील यांच्याशी औंधसह खटाव तालुक्यातील विविध समस्या विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. त्याचबरोबर औंधला भेट देण्याचे वसंत पवार व शिष्टमंडळाने दिलेले निमंत्रणही त्यांनी स्वीकारले. वसंत पवार म्हणाले, ‘सामान्य माणसाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून त्याबाबत येणाऱ्या अडीअडचणी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्याचे सांगितले.’

यावेळी शेखर चरेगावकर, मुकुंद चरेगावकर व औंध ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Aundh office bearers met Chandrakant Patil