खाजगी रुग्णालयांचे ऑडिटिंग; ३४ लाख रुपये केले परत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:47 IST2021-06-09T04:47:27+5:302021-06-09T04:47:27+5:30
सातारा : कोरोना रुग्णांकडून जास्तीचे पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयांसाठी ऑडिटर्स नेमले आहेत. ...

खाजगी रुग्णालयांचे ऑडिटिंग; ३४ लाख रुपये केले परत!
सातारा : कोरोना रुग्णांकडून जास्तीचे पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयांसाठी ऑडिटर्स नेमले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या या समितीमुळे जिल्ह्यातील ३४३ रुग्णांचे ३० लाख १६ हजार ८०६ रुपयांचे बिल कमी करण्यात आले.
कोरोनामुळे जिल्ह्यातील हजारो लोक बाधित झाले. त्यापैकी ऑक्सिजनची लेव्हल कमी झालेली आणि व्हेंटिलेटरची गरज पडली, अशा रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. जिल्ह्यांमध्ये ८५ सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. यापैकी बहुतांशी रुग्णालयांनी वाढीव बिले लावल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा ज्यादा दर लावून हॉस्पिटल्सच्या वतीने लूट सुरू होती.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीकडे तक्रारी प्राप्त होत्या, या तक्रारींची शहानिशा तज्ज्ञ ऑडिटरच्या माध्यमातून सुरू करण्यात आली. एकूण ८५ रुग्णालयांनी ३४ कोटी ७९ लाख ६० हजार २१४ रुपयांचे बिल लावलेले होते. ६ हजार ८६३ रुग्णांचे बिल तपासण्यात आले. यापैकी ३४३ रुग्णांकडून रुग्णालयांनी जादा पैसे आकारल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. या रुग्णालयांनी प्रांताधिकारीतर्फे नोटिसा देण्यात आल्या. रुग्णांचे बिल कमी करावे, अथवा ज्यांच्याकडून बिले अधिक घेतले आहेत, त्यांची बिले तत्काळ त्यांना परत करावीत, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार संबंधित रुग्णालयांनी पैसे परत करण्याची कार्यवाही केली.
चौकट
१) कोरोनावर उपचार केले जाणारे शहरातील हॉस्पिटल्स-८५
जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केले ऑडिटर्स -८५
बिल जास्त घेतल्याच्या तक्रारी -३४३
१० रुग्णालयांना नोटिसा (चौकट)
प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या वतीने वाढीव बिलाच्या पार्श्वभूमीवर ८५ रुग्णालयांना नोटिसा पाठविल्या. वाढीव बिल तत्काळ कमी करण्याच्या सूचना या नोटिशीत करण्यात आल्या होत्या. रुग्णालयांची तपासणी करण्यात आल्यानंतर जादाचे बिल कमी करण्यात आले.
३४३ जणांना मिळाले पैसे परत (चौकट)
कोरोनाबाधित ३४३ रुग्णांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने केलेल्या मोहिमेत फायदा मिळाला. या रुग्णांकडून अतिरिक्त बिले संबंधित हॉस्पिटलच्या वतीने घेण्यात आली होती, त्यांना आधी नोटिसा पाठवण्यात आल्या आणि बिल कमी करून घेण्यात आले.
कोट
जिल्ह्यामध्ये प्रत्येक प्रांत अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली टीम बनवण्यात आल्या. या टीमवर जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण ठेवण्यात आले. प्रशासनाने वाढीव बिल घेणाऱ्या हॉस्पिटलकडून पैसे परत मिळवून दिल्याने रुग्णांना दिलासा मिळू शकला आहे.
- शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा
स्टार ७८६