Atul Kumar Shah Incomparable Personality: Kulkarni | अतुलकुमार शहा अतुलनीय व्यक्तिमत्त्व : कुलकर्णी

अतुलकुमार शहा अतुलनीय व्यक्तिमत्त्व : कुलकर्णी

सातारा : ‘चंदूकाका सराफ महाराष्ट्रातील सर्वांत आघाडीच्या सुवर्णपेढीचे संचालक अतुलकुमार जीनदत्त शहा यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रांत अनुलनीय कार्य केले आहे. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे,’ असे गौरवोद्गार त्यांचे सहकारी बाळकृष्ण कुलकर्णी यांनी काढले.

चंदूकाका सराफ सुवर्णपेढीचे संचालक अतुलकुमार जीनदत्त शहा यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माणसातले माणूसपण शोधताना माणसातला देव सापडला तो चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे मालक अतुलकुमार जीनदत्त शहा यांच्यामध्ये. साधी राहणीमान, उच्च विचारसरणी आणि उक्ती व कृती यात एकरूपता असणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे पिताश्री जीनदत्त चंदूलाल शहा यांच्याकडून त्यांच्या अंगात बुद्धिचातुर्य, दयाळूपणा, क्षमाशीलता हे गुण उतरले, तसेच त्यांच्या मातोश्री कुसुमताई जीनदत्त शहा यांनी केलेल्या सुसंस्कारांमुळे त्यांची आयुष्यात जडणघडण योग्य पद्धतीने झाली. पारंपरिक सराफी व्यवसायाचे व्यावहारिक स्वरूप उत्तुंग शिखरावर पोहोचवण्याचे काम याच व्यक्तिमत्त्वाने केले. त्यांचे ज्येष्ठ बंधू किशोरकुमार जीनदत्त शहा यांची त्यांना तोलामोलाची साथ लाभली. त्यांचेही सराफी व्यवसायवृद्धीमध्ये महत्त्वाचे योगदान आहे. (वा.प्र.)

फोटो

२३अतुलकुमार शहा

Web Title: Atul Kumar Shah Incomparable Personality: Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.