फलटण वॉर्ड रचनेकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:37 IST2021-08-29T04:37:44+5:302021-08-29T04:37:44+5:30
वॉर्ड रचनेकडे लक्ष फलटण नगरपालिकेची स्थापना १८६८ मध्ये झाली असून, फलटण शहर ऐतिहासिक आणि प्राचीन आहे. २०११ च्या जनगणनेसुसार ...

फलटण वॉर्ड रचनेकडे लक्ष
वॉर्ड रचनेकडे लक्ष
फलटण नगरपालिकेची स्थापना १८६८ मध्ये झाली असून, फलटण शहर ऐतिहासिक आणि प्राचीन आहे. २०११ च्या जनगणनेसुसार शहराची लोकसंख्या ५० हजार ८०० आहे. नगरपालिकेत तीन स्वीकृत नगरसेवक आहेत. आगामी निवडणूक वॉर्ड रचनेप्रमाणे होण्याची शक्यता असल्याने अनेकांना स्वतःच्या ताकदीवर निवडून येण्याचा विश्वास वाटत आहे. त्यामुळे वॉर्ड रचनेवर अनेकांचे लक्ष लागून आहे.
चौकट
नंदकुमार भोईटे यांची उणीव
गेली ३० वर्षे नगरसेवक असलेले उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्यासारख्या हमखास निवडून येणाऱ्या अनुभवी नगरसेवकाची उणीव सत्ताधारी गटाला भासणार आहे.
चौकट -
रणजितसिंहांना दाखवावी लागणार ताकद
भाजपने जी जी जबाबदारी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर सोपविली ती ती त्यांनी पार पाडल्याने होम ग्राउंड असलेल्या फलटण नगरपालिका निवडणुकीत सत्ता आणण्यासाठी आणि स्वतःचे राजकीय वजन आणखी वाढविण्यासाठी रणजितसिंह यांना फलटण नगरपालिकेत आपली ताकद दाखवावी लागणार आहे.
चौकट -
सत्ता कायम ठेवण्यासाठी रामराजेंचे प्रयत्न
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी गेल्या ३० वर्षांपासून फलटणची सत्ता कायम ठेवली असून, याही निवडणुकीत ते सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याने स्वतः ते सूत्रे हाती घेणार आहेत.
फोटो नगरपालिका इमारतीचा
रामराजे व रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे आयकार्ड फोटो वापरावेत
चौकट -