वीर धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील : नलावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:45 IST2021-09-17T04:45:56+5:302021-09-17T04:45:56+5:30

शिरवळ : ‘खंडाळा तालुक्यातील वीर धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून, शासन निर्देशाप्रमाणे वीर धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची प्रक्रिया ...

Attempts to resolve pending issues of Veer Dam victims: Nalawade | वीर धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील : नलावडे

वीर धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील : नलावडे

शिरवळ : ‘खंडाळा तालुक्यातील वीर धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून, शासन निर्देशाप्रमाणे वीर धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची प्रक्रिया महिनाभरात सुरू करणार आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा पुनर्वसन उपजिल्हाधिकारी कीर्ती नलावडे यांनी केले.

सातारा येथील पुनर्वसन उपजिल्हाधिकारी कीर्ती नलावडे यांच्या कार्यालयात वीर धरणग्रस्त पुनर्वसन संघर्ष समितीचे पदाधिकारी व धरणग्रस्त शेतकऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीप्रसंगी त्या बोलत होत्या.

उपजिल्हाधिकारी कीर्ती नलावडे म्हणाल्या, ‘धरणग्रस्तांच्या मागण्या मान्य करत हे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असणारी संकलन सूची पुणे येथील पुनर्वसन विभागाकडे असल्याकारणाने त्या कार्यालयाकडून मागितली जाईल. ती प्राप्त होताच धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.’

यावेळी वीर धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत वेगवेगळ्या मागण्या बैठकीमध्ये मांडण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने धरणग्रस्तांना घरबांधणीसाठी दिलेले भूखंड, गावठाण नकाशा, निर्वाह भत्ता, त्याचप्रमाणे पर्यायी जमीन खंडाळा तालुक्यात देण्यासाठी, तसेच विविध मागण्यांबाबत चर्चा झाली.

नीरा उजवा कालवा प्रकल्पाचे अधिकारी विजय नलावडे म्हणाले, ‘धरणामधील जलाशयाची पाणीपातळी वेळोवेळी निश्चितविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत करून पुढील निर्णय घेतला.’

तहसीलदार विवेक जाधव, समितीच्या वतीने समन्वयक डॉ. विजय शिंदे, अध्यक्ष देवानंद चव्हाण, सचिव अजिंक्य चव्हाण, जयवंत चव्हाण, गणेश जाधव, विश्वास चव्हाण, विजय चव्हाण, विशाल गायकवाड, मधुकर कदम यांनी सहभाग घेतला. यावेळी तहसीलदार विवेक जाधव, समन्वयक डॉ. विजय शिंदे, अध्यक्ष देवानंद चव्हाण, सचिव अजिंक्य चव्हाण, भोळीचे सरपंच प्रशांत खुंटे, उपसरपंच महेश चव्हाण, भादे उपसरपंच विशाल गायकवाड, हरिश्चंद्र लिमण, विश्वास चव्हाण, जयवंत चव्हाण, गणेश भोसले, भास्कर कदम उपस्थित होते.

फोटो १७ वीर धरण

खंडाळा तालुक्यातील वीर धरणग्रस्तांच्या बैठकीप्रसंगी उपजिल्हाधिकारी कीर्ती नलावडे यांनी समस्या जाणून घेतल्या. यावेळी तहसीलदार विवेक जाधव उपस्थित होते. (छाया : मुराद पटेल)

Web Title: Attempts to resolve pending issues of Veer Dam victims: Nalawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.