टॉवरवर जाऊन एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:10 IST2021-02-05T09:10:17+5:302021-02-05T09:10:17+5:30

वडूज : जमिनीच्या वादातून इतर लोक त्रास देत असल्याच्या कारणावरून व अतिक्रमण करत असल्याचे बोलता म्हणून येथील पोलीस ...

Attempted suicide by going to the tower | टॉवरवर जाऊन एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

टॉवरवर जाऊन एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडूज : जमिनीच्या वादातून इतर लोक त्रास देत असल्याच्या कारणावरून व अतिक्रमण करत असल्याचे बोलता म्हणून येथील पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या वायरलेस टाॅवरवर चढून एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संबंधितावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सिध्देश्वर कुरोली येथील सागरेश्वर अनंता बनसोडे ( वय ३४ ) याने वडूज पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या सुमारे पन्नास ते सत्तर फूट उंचीच्या वायरलेस टाॅवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सागरेश्वर बनसोडे हा मोठमोठ्याने ओरडत माझ्या जमिनीवर अतिक्रमण केले असून, मला तेथील लोक त्रास देत आहेत, असे म्हणत वायरलेस टाॅवर जाऊन बसला. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला खाली येण्यास विनंती केली तरी तो जुमानत नव्हता. रात्री साडेआठ ते साडेअकरा वाजेपर्यंत हा वायरलेस टाॅवरवरील थरार वडूजकर अनुभवत होते. दरम्यान, सातारा येथून अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आले. त्यांच्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख व सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी बनसोडे याची समजूत काढून त्यास खाली येण्यास भाग पाडले. त्यावेळी कुठे पोलीस अधिकारी, कर्मचारी व घटनास्थळावरील उपस्थितांच्या जिवात जीव आला. आत्महत्येचे प्रयत्न केल्याप्रकरणी सागेश्वरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Attempted suicide by going to the tower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.