पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; पतीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST2021-09-07T04:47:41+5:302021-09-07T04:47:41+5:30
काळुराम पांडुरंग वचकल (वय ३६,रा. शिर्के कॉलनी, शिरवळ) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली ...

पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; पतीला अटक
काळुराम पांडुरंग वचकल (वय ३६,रा. शिर्के कॉलनी, शिरवळ) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.
याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिरवळ (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत असणाऱ्या शिर्के काॅलनी याठिकाणी मंगळवार, दि. १५ जून २०२१ रोजी पत्नी वनिता वचकल हिला पती काळुराम वचकल याने शिवीगाळ व दमदाटी केल्याची तक्रार पत्नी वनिता वचकल हिने शिरवळ पोलीस स्टेशनला दाखल केली होती. त्याचप्रमाणे तक्रार दाखल केल्यानंतर वनिता वचकल ही शिर्के कॉलनी याठिकाणी कपडे आणण्याकरिता गेली असता त्याठिकाणी असणाऱ्या प्रेयसीला पत्नी वनिता वचकल हिने ‘तू येथे का आली आहेस’ अशी विचारणा केली असता पती काळूराम याने स्वयंपाक घरातील चाकू आणून पत्नी वनिता वचकल हिच्यावर वार करीत गंभीर जखमी करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला तर प्रेयसीने पत्नी वनिता वचकल हिची आई शोभा दिलीप गिरी (रा. शिंदेवाडी ता. भोर ) हिच्यावर चाकूने वार करीत गंभीर जखमी केले होते त्याचप्रमाणे मेव्हणा संदीप गिरी याला पती काळूराम याने ढकलून देत जखमी केले होते. यावेळी शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यापासून काळुराम वचकल व मनीषा लोहार हे दोघे फरार झाले होते.