शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कासारशिरंबेत बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न, पाचजण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:18 IST

सापळ्यातून हिसका देऊन बिबट्याची उसाच्या शेतात धूम

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील कासारशिरंबे येथे मारुती संभाजी बोंद्रे यांच्या उसाच्या शेतात एक बिबट्या सापळ्यात अडकला होता. याबाबत पोलिस पाटील यांनी वनविभागास कळविल्यानंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली; परंतु बिबट्याने सापळ्यातून हिसका देऊन निसटून उसाच्या शेतात धूम ठोकली होती. ही घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली.वन कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता पाचजणांकडे शिकारीचे साहित्य आढळून आले. चौकशीअंती पाच आरोपी ताब्यात घेऊन शिकारीचा प्रयत्न करणाऱ्याच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.प्रकाश बापूराव पवार, सुनील दिलीप पवार, विशाल दिलीप पवार, मिथुन भाऊराव शिंदे, भीमराव बाबूराव पवार (सर्व रा. भालकी, ता. भालकी, जिल्हा बिदर) हे सध्या ऊसतोड मजूर म्हणून काम करीत आहेत. त्यांनी हा शिकारीचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. यांच्याकडे दोन बहेली सापळ्यासह तारेचा पिंजरा, टोकदार लोखंडी सळई, लाकडी मूठ असलेली, तीन वाघर, नायलॉन रस्सी, क्लच वायरचा फास, इत्यादी शिकारीचे साहित्य आढळून आले. ते साहित्य ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.उपवनसंरक्षक सातारा आदिती भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वन संरक्षक महेश झांजुर्णे, वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील, वनपाल बाबूराव कदम, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनरक्षक दशरथ चिट्टे, अभिनंदन सावंत, कविता रासवे, अतुल कळसे, सतीश पाटील यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडleopardबिबट्याforest departmentवनविभाग