शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: वडवाडी येथे विवाहितेस जीवे मारण्याचा प्रयत्न, पती-पत्नीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 18:48 IST

मुराद पटेल  शिरवळ : वडवाडी ता. खंडाळा येथे पतीला मोबाईलवर केलेले संदेश व्हायरल करण्याची धमकी देत २ लाख रुपये ...

मुराद पटेल शिरवळ : वडवाडी ता. खंडाळा येथे पतीला मोबाईलवर केलेले संदेश व्हायरल करण्याची धमकी देत २ लाख रुपये न दिल्याने विवाहितेला गळफास लावत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली.याप्रकरणी विशाल दिलीप बामणे (वय ३३), रेश्मा विशाल बामणे (३०, रा.वडवाडी ता.खंडाळा) असे अटक केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडवाडी येथील मयुरी किरण जाधव (वय २१) ही विवाहिता कुटुंबियांसमवेत राहते. साधारण दोन महिन्यांपूर्वी मयुरी ही कपडे वाळत घालत असताना विशाल बामणे याने चिठ्ठीद्वारे मोबाईल नंबर देत संदेश पाठविण्यास सांगितले. मयुरी अन् विशाल फोन तसेच मॅसेजवर बोलत असल्याचे विशालची पत्नी रेश्मा हिला समजल्यानंतर मयुरीकडे २ लाख रुपयांची मागणी करत संदेश व्हायरल करण्याची धमकी दिली. दरम्यान, ३० एप्रिल रोजी मयुरीला गळफास लावत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ती बेशुद्ध पडल्याच्या अवस्थेत सासरे रमेश जाधव यांनी त्वरित भोर जि. पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी मयुरी जाधव हिने दिलेल्या फिर्यादीवरून शिरवळ पोलीस ठाण्यात विशाल बामणे व रेश्मा बामणे ह्या पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शिरवळ पोलिसांनी बामणे यांना अटक करीत खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने बुधवार दि.५ जूनपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून पोलीस उपनिरीक्षक नयना कामथे ह्या अधिक तपास  आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी