शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
6
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
7
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
8
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
9
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
10
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
11
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
12
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
13
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
16
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
19
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
20
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप

अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न, अतिक्रमण हटाव मोहीमेला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 12:00 IST

पोलिसांच्या वाहतूक शाखेने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहीमेला विरोध दर्शवत हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाही दिल्या.

ठळक मुद्देसाताऱ्यात हॉकर्स संघटनेचे आंदोलनपोलिसांच्या अतिक्रमण हटाव मोहीमेला विरोध

सातारा : पोलिसांच्या वाहतूक शाखेने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहीमेला विरोध दर्शवत हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाही दिल्या.शहरातील अतिक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या अतिक्र्रमणांविरोधात सातारा पालिकेने सोमवार, दि. १८ पासून कारवाई मोहीम हाती घेतली आहे. एकीकडे पालिका तर दुसरीकडे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडूनही सोमवारी बसस्थानकासमोरील अतिक्रमणे हटविण्यात आली. येथील फूटपाथवर अनेक विक्रेत्यांनी बांबूचे शेड उभारून व्यवसाय सुरू केला होता. विक्रेत्यांचा विरोध झुगारून पोलिसांनी फुटपाथ व रस्त्यावरील अतिक्रमणे काढली.दरम्यान, पोलीस प्रशासन न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंखन करीत असल्याचा आरोप सर्वधर्मिय सुशिक्षित बेरोजगार हॉकर्स संघटनेच्या वतीने करण्यात आला. ही मोहीम तातडीने थांबविण्यात यावी, यासाठी गुरुवारी सकाळी पावणे अकरा वाजता हॉकर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण निकम, सातारा शहर अध्यक्ष संजय पवार, सागर भोगावकर, विनोद मोरे, पिरमोहम्मद बागवान, राजेंद्र तपासे, प्रशांत धुमाळ, फिरोज पटवेकर, यांच्यासह सुमारे तीनशे ते चारशे हातगाडीधारक बसस्थानकासमोर एकत्र आले.

यानंतर संजय पवार व लक्ष्मण निकम यांनी सोबत आणलेल्या बाटलीतील रॉकेल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतकर्तमुळे पुढील अनर्थ टळला. या आंदोलनामुळे बसस्थानक मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

टॅग्स :PoliceपोलिसSatara areaसातारा परिसर