तामजाईनगरसह शाहूपुरीला विकासाचा चेहरा देण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:43 IST2021-08-24T04:43:37+5:302021-08-24T04:43:37+5:30
सातारा : निवडणुकीदरम्यान तामजाईनगरच्या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या निमित्ताने दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न आपण केला आहे. तामजाईनगरसह संपूर्ण शाहूपुरीस ...

तामजाईनगरसह शाहूपुरीला विकासाचा चेहरा देण्याचा प्रयत्न
सातारा : निवडणुकीदरम्यान तामजाईनगरच्या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या निमित्ताने दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न आपण केला आहे. तामजाईनगरसह संपूर्ण शाहूपुरीस विकासाचा चेहरा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन सातारा- जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
शाहूपुरी येथील सुमारे ४० लाख रुपये अंदाजपत्रकीय रकमेच्या मुख्य रस्त्याच्या खडीकरण-डांबरीकरण विकासकामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे भारत भोसले, विकास देशमुख, नीलम देशमुख, राजेंद्रकुमार मोहिते, सुहास वहाळकर, शोभा केंडे, माधवी शेटे, विश्वतेज बालगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘मागील काही वर्षांत आमदार फंड, २५-१५ योजना, जिल्हा नियोजन, तसेच शासन विशेष निधी या माध्यमातून सुमारे १५ कोटींहून अधिक रकमेची रस्ते विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन कण्हेर पाणीपुरवठा योजना हा आमचा शाहूपुरीसाठीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या रखडलेल्या योजनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेवेळी अतिरिक्त १२ कोटींचा मागणी प्रस्तावसुद्धा सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून मंजूर करून घेतला असून काही इतर तांत्रिक अडचणींचाही निपटारा होऊन येत्या काही दिवसांतच आपल्या सर्वांचे हे स्वप्न वास्तवात येणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमावेळी मुख्य रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नीलम देशमुख व उपस्थित महिलांच्या हस्ते आमदार भोसले यांचा सत्कार करण्यात आला. अनेक गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींनीसुद्धा सत्कार केला.
अलका उजगारे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. अजली साळवे यांनी आभार मानले. कार्यक्रमास
मेघा गाढवे, सविता चव्हाण, राणी चव्हाण, मंजुषा निकम, पौर्णिमा नेवसे, नलिनी साबळे, कांताताई फडतरे यांच्यासह युवा सहकारी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
...................