लग्न लावून देण्याच्या आमिषाने महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:39 IST2021-03-19T04:39:23+5:302021-03-19T04:39:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : लग्न लावून देतो, असे आमिष दाखवून एका ५० वर्षीय महिलेकडून १ लाख घेऊन तिच्यावरच ...

लग्न लावून देण्याच्या आमिषाने महिलेवर अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : लग्न लावून देतो, असे आमिष दाखवून एका ५० वर्षीय महिलेकडून १ लाख घेऊन तिच्यावरच दोघांनी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याबाबतची तक्रार संबंधित महिलेने शहर पोलीस ठाण्यात दिल्यावर दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. शंकर खरात, संकेत लोखंडे (दोघे रा. पिरवाडी, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पीडित महिला व संशयितांची २०१३ मध्ये ओळख झाली. संबंधित पीडीत महिला एकटीच राहत आहे. ती स्वतःच्या लग्नासाठी स्थळ शोधत होती. याची माहिती दोघा संशयितांना मिळाल्यानंतर त्यांनी महिलेशी ओळख वाढवली. आम्ही तुमचे लग्न लावून देतो, यासाठी १ लाख खर्च येईल, असे त्यांनी महिलेला सांगितले. पीडित महिलेने एक लाखाची रक्कम बँकेतून काढून आणून संशयितांना दिली. एकेदिवशी पैसे दिल्यानंतर संशयित दोघे रात्री उशिरा महिलेच्या घरी गेले. लग्नासाठी फोटो पाहिजे असे सांगून त्यांनी महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे संबंधित पीडित महिला घाबरली. संशयितांनी धमकी देऊन जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला व विवस्त्रावस्थेत फोटो काढले. ही घटना २०१३ मध्ये घडली. पीडित महिलेने गुरुवारी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. रात्री उशिरापर्यंत संशियतांना पोलिसांनी अटक केली नव्हती.