साताऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:47 IST2021-09-08T04:47:36+5:302021-09-08T04:47:36+5:30

सातारा : एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर पाटखळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत असणाऱ्या एका लॉजवर नेऊन युवकाने ...

Atrocities on a minor girl in Satara | साताऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

साताऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सातारा : एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर पाटखळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत असणाऱ्या एका लॉजवर नेऊन युवकाने अत्याचार केला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी युवकाला अटक केली.

निहाल अदील शेख (रा. वाठार, ता. कोरेगाव) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील एका चौदा वर्षीय मुलीला निहाल याने लग्नाचे आमिष दाखविले. 'मला तुझ्याशी बोलायचे आहे,' असे सांगून दि. ५ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता दुचाकीवर बसवले आणि सातारा तालुक्यातील पाटखळ येथील एका लॉजवर नेले. येथे तिच्याशी बोलण्याचा बहाणा करत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, हा घडलेला प्रकार मुलीने तिच्या आईला सांगितला. यानंतर आईने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी निहाल शेखवर अत्याचार तसेच जातीवाचक शिवीगाळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. दरम्यान, घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी भेट देऊन माहिती घेतली आणि अधिकाऱ्यांना तपासाबाबत सूचना दिल्या.

Web Title: Atrocities on a minor girl in Satara