शिवक्रांती हिंदवी सेनेकडून मदतीचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:34 IST2021-03-14T04:34:25+5:302021-03-14T04:34:25+5:30
कुडाळ : करंदोशी (ता. जावळी) येथील शरद सपकाळ यांचे १३ वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांचे वडील अंध असून, आई ...

शिवक्रांती हिंदवी सेनेकडून मदतीचे आश्वासन
कुडाळ : करंदोशी (ता. जावळी) येथील शरद सपकाळ यांचे १३ वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांचे वडील अंध असून, आई वयोवृद्ध आहे. शरदची पत्नी मजुरी करून कुटुंब चालवित आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे शिवक्रांती हिंदवी सेनेच्या जावळी तालुक्याचे उपाध्यक्ष गणेश सपकाळ यांना समजले.
तालुकाध्यक्ष शिवा गोरे व सर्व सदस्यांनी या कुटुंबाची भेट घेतली. या कुटुंबातील ओमकार दहावीत आहे आणि अस्मिता आठवीत आहे. या मुलांच्या शिक्षणासाठी लागणारी सर्व मदत संघटनेमार्फत केली जाईल, असे आश्वासन गणेश सपकाळ यांनी दिले.
शिवक्रांती हिंदवी सेनेकडून आजअखेर समाजातील दुर्लक्षित, गरीब अशा लोकांना, त्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या कार्यामुळे परिसरातून कौतुक होत आहे.