अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या संशयिताला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:41 IST2021-04-09T04:41:40+5:302021-04-09T04:41:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : येथील बसस्थानकाशेजारील जम्बो कोरोना सेंटरजवळ अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या संशयिताला बेदम मारहाण करण्यात आली. ...

Assault on a suspect charged with aggravated assault | अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या संशयिताला मारहाण

अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या संशयिताला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : येथील बसस्थानकाशेजारील जम्बो कोरोना सेंटरजवळ अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या संशयिताला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सात जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदारावर तीन दिवसांपूर्वी बलात्कार व खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान, मारहाणीच्या घटनेमुळे कोविड सेंटर परिसरात तणावाचे वातावरण झाले होते.

सोमनाथ शिवाजी भारती (वय २७, रा. बावधन, ता.वाई) असे जखमी झालेल्या तक्रारदार युवकाचे नाव आहे. याच्याविरुद्ध महिलेला अश्लील फोटो दाखवून तिच्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. तक्रारदार सोमनाथ भारती याने तक्रारीत म्हटले आहे की मारहाणीची घटना दि. ४ रोजी दुपारी साडेचार वाजता कोविड सेंटरजवळ घडली. संशयित महिलेसह एकूण सात जणांनी लाथा, बुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात तक्रारदार युवकाच्या कानाला लागले आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Assault on a suspect charged with aggravated assault