शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

भादे येथे हत्याराने युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 15:06 IST

खंडाळा तालुक्यातील भादे गावच्या हद्दीतील वीर धरण परिसरात अज्ञातांनी अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वयाच्या अज्ञात युवकाचा तीक्ष्ण हत्याराने व दगडाने डोक्यात व मानेवर सपासप वार करुन खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देभादे येथे हत्याराने युवकाचा खूनघटनास्थळी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण

मुराद पटेलशिरवळ  - खंडाळा तालुक्यातील भादे गावच्या हद्दीतील वीर धरण परिसरात अज्ञातांनी अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वयाच्या अज्ञात युवकाचा तीक्ष्ण हत्याराने व दगडाने डोक्यात व मानेवर सपासप वार करुन खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, भादे ता.खंडाळा गावच्या हद्दीतील वीर धरण परिसरात पाण्यामध्ये एक मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. याबाबतची संबंधितांनी तत्काळ शिरवळ पोलीस स्टेशनला याबाबतची दुरध्वनीदवारे कल्पना दिली.

यावेळी घटनेची माहिती समजताच तत्काळ घटनास्थळी फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, खंडाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डाँ.सागर वाघ व एलसीबी पथक, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई , सागर अरगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भानुदास भोईटे, रमेश वळवी, पोलीस हवालदार संजय पंडित, सी.एन.शेडगे, आप्पा कोलवडकर, अमोल जगदाळे, स्वप्निल दौंड, संतोष ननावरे,सुरेश मोरे, सचिन वीर, नितीन महांगरे यांनी धाव घेतली असता त्याठिकाणी नीरा नदीच्या पाञात एक अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वयाच्या युवकाचा मृतदेह तरंगताना दिसला.

यावेळी मृतदेहाची पाहणी केली असता मृत युवकाच्या डोक्यामध्ये अज्ञातांनी तीक्ष्ण हत्याराने वार करुन व दगडाने खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. यावेळी घटनास्थळी पोलीसांनी पाहणी केली असता घटनास्थळापासून काही अंतरावर रक्ताचे थारोळेही आढळून आले.

यावेळी घटनास्थळी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले होते. या घटनेची नोंद करण्याचे काम शिरवळ पोलीस स्टेशनला सुरु होते.

टॅग्स :MurderखूनSatara areaसातारा परिसर