आसामचं विशेष पथक कोरेगावात

By Admin | Updated: October 14, 2014 23:22 IST2014-10-14T22:15:58+5:302014-10-14T23:22:27+5:30

मतदारांच्या संख्येत वाढ : चार ठिकाणी सहाय्यकारी मतदानकेंद्रे

Assam's special squad in Koregaon | आसामचं विशेष पथक कोरेगावात

आसामचं विशेष पथक कोरेगावात

कोरेगाव : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाची संपूर्ण तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. मतदानासाठी आवश्यक ती यंत्रणा मंगळवारी सकाळी ११ वाजता रवाना करण्यात आली. संवेदनशील म्हणून गणल्या जाणाऱ्या या मतदारसंघाची ओळख आता बदलू लागली असून, या निवडणुकीत एकही मतदान केंद्र संवेदनशील राहिलेले नाही. मतदानाची टक्केवारी वाढावी प्रशासनाने चार मतदान केंद्राची निर्मिती केली आहे. एकंदरीत मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था असून, मतदान व्यवस्थित पार पडेल, असा विश्वास निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत डॉ. संजय कुंडेटकर यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी या मतदारसंघात २ लाख ८३ हजार ३५७ मतदार होते, नव्याने पुनर्रिक्षण मोहीम राबविण्यात आल्याने मतदारांमध्ये वाढ झाली आहे. ३० सप्टेंबर २०१४ अखेर २ लाख ९० हजार २५९ मतदार असून, त्यामध्ये १ लाख ४९ हजार ४५९ पुरुष तर १ लाख ४० हजार ८०० मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महसूल प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. कोरेगाव मतदारसंघामध्ये कोरेगाव, खटाव आणि सातारा तालुक्यातील गावांचा समावेश आहे. एकूण ३४७ मतदान केंद्रे असून, जेथे १२०० हून अधिक मतदान आहे. अशा चार ठिकाणी मतदान सुलभरित्या होण्यासाठी सहाय्यकारी मतदान केंद्रे बनविण्यात आली आहेत.
जळगाव येथील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे, त्यामुळे मतदान प्रक्रियेनंतर मतदानाच्या मशीन्स तेथेच जमा करण्यात येणार आहे, तशी व्यवस्था तेथे करण्यात आली आहे.
मतमोजणी केंद्रामध्ये प्रत्यक्ष मतमोजणीपर्यंत चार दिवस मशीन्स राहणार असल्याने तेथे स्थानिक पोलीस दलासह आसाम येथील विशेष रेल्वे पोलीस पथक, वन विभाग आणि सोलापूर येथील राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रातील पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Assam's special squad in Koregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.