डांबरीकरणाच्या कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:45 IST2021-08-20T04:45:01+5:302021-08-20T04:45:01+5:30
पुसेगाव : पंचायत समिती सदस्या निलादेवी सुभाषराव जाधव यांच्या शेष फंडातून पुसेगाव येथील दोन अंतर्गत रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण ...

डांबरीकरणाच्या कामास प्रारंभ
पुसेगाव : पंचायत समिती सदस्या निलादेवी सुभाषराव जाधव यांच्या शेष फंडातून पुसेगाव येथील दोन अंतर्गत रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचे उद्घाटन प्रियाताई महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
पुसेगावातील बाचल गिरणी ते कुंभारटेक तसेच भंडारी चेंबर्सपासूनच अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याबाबत मागणी होती. आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रियाताई शिंदे व पंचायत समितीच्या सदस्या निलादेवी जाधव यांच्या हस्ते रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी रणधीर जाधव, प्राचार्य टी. एन. जाधव, भरत मुळे, अंकुशराव पाटील, नवनाथ फडतरे, चंद्रकांत जाधव, प्रवीण जाधव, सुसेन जाधव, शंकर जाधव, अमर खटावकर, श्रीकांत पवार, दिलीप बाचल, विजय जाधव, डॉ. महेश भिसे, रामचंद्र जाधव, महादेव जाधव, ओंकार जाधव, नवनाथ घाडगे, सुरेखा जाधव, हेमलता फडतरे, प्रेमा जाधव, लता जाधव, मनीषा जाधव, सुरेखा जावळे उपस्थित होते.