रस्त्याचे डांबरीकरण; वाहनधारकांत समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:16 IST2021-02-05T09:16:56+5:302021-02-05T09:16:56+5:30
वाहनधारकांत समाधान सातारा : पालिकेजवळ असलेल्या शाहू चौकातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. पावसाळ्यात या रस्त्याला डबक्याचे स्वरूप ...

रस्त्याचे डांबरीकरण; वाहनधारकांत समाधान
वाहनधारकांत समाधान
सातारा : पालिकेजवळ असलेल्या शाहू चौकातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. पावसाळ्यात या रस्त्याला डबक्याचे स्वरूप आल्याने या मार्गावरून ये-जा करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. पालिकेने नुकतेच या मार्गाचे डांबरीकरण केल्याने वाहनधारकांची परवडही आता थांबली आहे. उशिरा का होईना परंतु पालिकेने डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी लावल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दर उतरल्याने
स्ट्रॉबेरीला मागणी
पाचगणी : ‘स्ट्रॉबेरी लॅण्ड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरची लालचुटूक स्ट्रॉबेरी बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दर मोठ्या प्रमाणात उतरल्याने पर्यटकांमधून स्ट्रॉबेरीला मागणी वाढली आहे. सध्या दीडशे ते दोनशे रुपये प्रतिकिलो या दराने स्ट्रॉबेरीची विक्री केली जात आहे. काही दिवसांपूर्वी हाच दर ४०० ते ६०० रुपयांच्या घरात होता. शेतकऱ्यांनी यंदा नाबीला, कॅमारोजा, विंटर डाऊन व स्वीटचार्ली जातीच्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले आहे.