अटक टाळण्यासाठी मागितले दहा हजार

By Admin | Updated: February 13, 2015 00:50 IST2015-02-13T00:15:25+5:302015-02-13T00:50:33+5:30

प्रकरण मिटविणारा मध्यस्थ फरार

Asked to avoid arrest ten thousand | अटक टाळण्यासाठी मागितले दहा हजार

अटक टाळण्यासाठी मागितले दहा हजार

सातारा : मारामारीच्या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी दहा हजारांची लाच मध्यस्तीकरवी घेताना पकडण्यात आलेल्या हवालदाराचे नाव संदीप सदाशिव खाडे (वय ३२, रा. धामणी, ता. माण) असे आहे. मात्र, त्याचा मध्यस्थ विजय विठ्ठल खाडे (रा. जाशी, ता. माण) हा फरार झाला आहे.काही दिवसांपूर्वी पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये मारामारीच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी एका तक्रारदाराला अटक न करण्यासाठी पुसेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक संदीप खाडे याने तक्रारदाराकडे दहा हजारांची लाच मागितली. त्यानंतर संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे यासंदर्भात रितसर तक्रार दाखल केली. संदीप खाडे याने त्याच्या ओळखीचा असलेला विजय खाडे याला पैसे घेण्यास सांगितले. दहिवडी- पुसेगाव रस्त्यावर बुधवारी दुपारी सापळा लावला. विजयने पैसे स्वीकारुन पलायन केले. पुसेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)

पंचानेच पाजले पाणी
तक्रारदारासोबत असलेल्या व्यक्तीने संदीप खाडेला ‘साहेब पाणी द्या,’ असे सांगितले. त्यावेळी खाडेने शिवी देऊन ‘इथे कशासाठी आला आहेस, कळत नाही का,’ अशी त्या व्यक्तीला उलट दमबाजी केली. मात्र, ज्या व्यक्तीला खाडेने दमबाजी केली, ती व्यक्ती चक्क या प्रकरणातील पंच असल्याचे समजताच खाडेची चांगलीच तंतरली.

Web Title: Asked to avoid arrest ten thousand