शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आंदोलकांच्या मंडपात येण्यापेक्षा विधीमंडळात आरक्षण मागा, मराठा आंदोलकांचे सर्व राजकीय नेत्यांना आवाहन

By दीपक देशमुख | Updated: October 31, 2023 16:23 IST

तुमच्यासारखे किती आले फिरंगे..उपोषणाला बसलाय भाऊ आमचा जरांगे!

सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण साखळी उपाषणाच्या पाचव्या दिवशी शेकडो आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले. यावेळी राजकीय नेत्यांनी मराठा आंदोलकांच्या मंडपात येण्यापेक्षा मुंबईला विधीमंडळात जावे, विशेष अधिवेशन बोलावून आरक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी केली. दरम्यान, सातारा शहरातून शेकडो आंदोलकांनी दुचाकी रॅली काढली.आमरण उपोषणादरम्यान मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली तरी सरकार दखल घेत नसल्याने राज्यभर मराठा आंदोलनाचा भडका उडाला आहे. सातारा जिल्ह्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी शेकडो आंदोलकांनी आंदोलन केले. आजच्या साखळी उपोषणात जिहे, बोरखळ, पाटखळ, आरळे यासह परळी भागातील सर्व गावांमधील मराठा बांधव सहभागी झाले होते. जास्त संख्येने गावे असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय गर्दीने फुलून गेला. शहरातून शेकडो युवकांनी काढलेली रॅली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर गर्दीत आणखी भर पडली.आंदोलनात कधी टाळ-मृदंगाच्या गजरात भजन, ओव्या म्हटल्या जात होत्या. तर कधी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. एका आंदोलकांने 'गर्जा महाराष्ट्र माझा' आणि शूर आम्ही सरदार हे गीते गायली. यामुळे आंदोलकांना स्फुरण चढले. सर्वांनी टाळ्याच्या गजरात साथ दिली तर कुणी भगवा ध्वज गरागर फिरवला. दुपारी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. आंदोलकांनी आरक्षणासाठी विधीमंडळात विशेष अधिवेशन बोलावावे व मराठा आरक्षणाची बाजू मांडावी, असे आवाहन केले. यावेळी मराठा समाज बांधव म्हणून याठिकाणी आलो आहे. कायद्याच्या कसोटीवर टिकेल असे आरक्षण समाजाला मिळावे, असे मत व्यक्त करून आरक्षण मिळण्यासाठी जे करता येईल, ते करणार असल्याचे सांगितले.तुमच्यासारखे किती आले फिरंगे..उपोषणाला बसलाय भाऊ आमचा जरांगे!आंदोलकांनी वेगवेगळ्या घोषणा देताना नेत्यांवर चौफेर हल्ला केला. सदा.. बंद कर तुझी वळवळ, मराठ्यांची उभी राहिलीय चळवळ!, मराठ्यांच्या विरोधात बसली जरी टोळी.. आमचेच बांधव देतील तुम्हाला साडी अन् चोळी!, तुमच्यासारखे किती आले फिरंगे.. उपोषणाला बसलाय भाऊ आमचा जरांगे!, ओ नारायणराव.. तुमच्या बाता झाल्या छोट्या.. मराठ्यांच्या घरामध्ये तलवारी आहेत मोठ्या! अशा घोषणांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaratha Reservationमराठा आरक्षण