आशियाई महामार्गावरील सुरक्षा धोक्यात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:35 IST2021-03-15T04:35:16+5:302021-03-15T04:35:16+5:30
महामार्गावर प्रत्येक उड्डाणपुलाच्या अगोदर दोन्ही बाजूंनी संरक्षणासाठी लोखंडी ग्रील बनविण्यात आले होते. मात्र, बहुतांशी ठिकाणी अपघाताने वा अन्य कारणाने ...

आशियाई महामार्गावरील सुरक्षा धोक्यात...
महामार्गावर प्रत्येक उड्डाणपुलाच्या अगोदर दोन्ही बाजूंनी संरक्षणासाठी लोखंडी ग्रील बनविण्यात आले होते. मात्र, बहुतांशी ठिकाणी अपघाताने वा अन्य कारणाने हे संरक्षक ग्रील तुटले आहेत. मात्र, त्यानंतर त्याकडे प्राधिकरणाने डोळेझाकपणा केला आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनांची आणि प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे, तर खंडाळापासून शिंदेवाडीपर्यंत कित्येक ठिकाणी व्यावसायिकांनी संरक्षक लोखंडी ग्रील तोडून प्रवेशद्वार तयार केले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी बेकायदेशीर रस्ता क्राॅसिंग करणे धोक्याचे बनले आहे.
(कोट...)
खंबाटकी बोगद्यात रस्त्याच्या बाजूने असणारी संरक्षक लोखंडी ग्रील गायब आहेत. काही मर्क्युरी बंद असल्याने बोगद्यात पुरेसा उजेड नसतो. तसेच बाजूच्या ड्रेनेज योजनाही मोडकळीस आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी बोगद्यातील रस्त्यावरून वाहत असते. या पाण्यामुळे रस्ता निसरडा बनून छोट्या वाहनांना धोका वाढतो. महामार्गावरीलही संरक्षक ग्रील तातडीने दुरुस्त करण्यात याव्यात.
-युवराज ढमाळ, सामाजिक कार्यकर्ते, पारगाव
चाैकट..
महामार्गाची शिस्त पाळा
खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असणाऱ्या ‘एस’ वळणाचा धोका अद्याप कमी झाला नाही. बोगद्याच्या पुढे आल्यावर तीव्र उतारामुळे वाहनांची गती वाढत जाते हे बऱ्याचदा चालकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे येथे वेगाची मर्यादा पाळणे तसेच महामार्गावर ज्या ठिकाणी हायवे क्रॉसिंगला मनाई आहे, तेथे सूचनांचे पालन करून महामार्गाची शिस्त पाळणे गरजेचे आहे.
१४खंडाळा
खंडाळानजीकच्या महामार्गावरील दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे तुटल्याने धोका वाढला आहे.