नववधू स्पर्धेत अश्विनीची बाजी
By Admin | Updated: November 22, 2014 00:19 IST2014-11-21T21:16:14+5:302014-11-22T00:19:14+5:30
नववधू मेकअप, पोशाख, भावी जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा, एकत्र कुटुंबपद्धती, संसाराबद्दलच्या अपेक्षा आदींबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या़

नववधू स्पर्धेत अश्विनीची बाजी
कऱ्हाड : येथील इनरव्हिल क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या नववधू स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ सातारा, सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, मिरज येथील स्पर्धकांनी यात सहभाग नोंदविला़ यात सातारच्या अश्विनी कदमने प्रथम, इस्लामपूरच्या प्रियंका शिंगणने द्वितीय तर कऱ्हाडच्या केतकी कर्णिकने तृतीय क्रमांक मिळविला़ वेणुताई चव्हाण सभागृहात झालेल्या स्पर्धेत नववधू मेकअप, पोशाख, भावी जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा, एकत्र कुटुंबपद्धती, संसाराबद्दलच्या अपेक्षा आदींबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या़ तीन फेऱ्यांमध्ये स्पर्धेची उत्सुकता वाढत गेली़ कऱ्हाडच्या मिरॅकल ब्युटीपार्लरच्या संयोगिता जाधव यांचे मार्गदर्शन लाभलेल्या ऋतुजा जाधवने बेस्ट हेअर स्टाईलचे बक्षीस पटकाविले, तर सोनाली शिर्के ने उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले़
पल्लवी भोसले, पल्लवी बिच्छे, आशा जोशी यांनी परीक्षक म्हणून काम पहिले़ बक्षीस वितरण समारंभ राजेश खराटे, जीवन पवार, मनीषा जाधव यांच्या हस्ते झाला़ यावेळी छाया पवार, स्वाती दाभोळे यांची प्रमुख उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)
कऱ्हाड येथील नववधू स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसमवेत मान्यवर.