अश्विन मुदगल सातारचे नवीन जिल्हाधिकारी

By Admin | Updated: July 30, 2014 23:39 IST2014-07-30T23:38:41+5:302014-07-30T23:39:32+5:30

सातारा : सातारचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून अश्विन अशोक मुदगल यांची नियुक्ती झाली आहे.

Ashwin Mudgal new Collector of Satara | अश्विन मुदगल सातारचे नवीन जिल्हाधिकारी

अश्विन मुदगल सातारचे नवीन जिल्हाधिकारी

सातारा : सातारचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून अश्विन अशोक मुदगल यांची नियुक्ती झाली आहे. बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या नियुक्तीचा आदेश सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. दरम्यान, सातारचे जिल्हाधिकारी असलेले डॉ. रामास्वामी एन. यांची मुंबई येथे ‘म्हाडा’मध्ये बदली झाली.
वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेले मुदगल ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथील असून, ते २००७ च्या बॅचचे अधिकारी आहेत. २००७ मध्ये ते नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. याच पदावर नंतर त्यांची पंढरपूर येथे बदली झाली. २००९ मध्ये त्यांची सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली. यानंतर ते २०१२ मध्ये यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Ashwin Mudgal new Collector of Satara