सस्तेवाडीत आशासेविकेला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:22+5:302021-06-16T04:50:22+5:30
फलटण : लॉकडाऊनमध्ये दुकानावर झालेल्या कारवाईचा राग मनात धरून, सस्तेवाडी (ता. फलटण) येथे आशासेविकेला लोखंडी ...

सस्तेवाडीत आशासेविकेला मारहाण
फलटण : लॉकडाऊनमध्ये दुकानावर झालेल्या कारवाईचा राग मनात धरून, सस्तेवाडी (ता. फलटण) येथे आशासेविकेला लोखंडी हातोडा आणि गजाने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी पितापुत्राला पोलिसांंनी अटक केली आहे.
याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, सस्तेवाडी (ता.फलटण) येथे दि. १३ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान शीतल संतोष शिंदे (वय ३२, रा.सस्तेवाडी ता.फलटण) या आशासेविकेला लॉकडाऊनमध्ये आपल्या दुकानावर झालेल्या कारवाईचा राग मनात धरून राजेंद्र तुकाराम शिंदे आणि सूरज राजेंद्र शिंदे (दोघे रा.सस्तेवाडी) या बापलेकांनी लोखंडी हातोडा व गजाने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी दोघा बापलेकांना पोलिसांंनी अटक केली असून, अधिक तपास पोलीस हवालदार रामदास लिमन करीत आहेत.