कोरोना रोखण्यात आशा सेविका महत्त्वाच्या - वायदंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:40 IST2021-05-23T04:40:06+5:302021-05-23T04:40:06+5:30
खटाव : ‘कोरोनाच्या महामारीत आशा सेविकांचे काम हे कोरोना योद्ध्याचे आहे. कोरोनाला रोखण्यात आशा सेविकांची मोठी भूमिका आहे. घरोघरी ...

कोरोना रोखण्यात आशा सेविका महत्त्वाच्या - वायदंडे
खटाव : ‘कोरोनाच्या महामारीत आशा सेविकांचे काम हे कोरोना योद्ध्याचे आहे. कोरोनाला रोखण्यात आशा सेविकांची मोठी भूमिका आहे. घरोघरी जाऊन तपासणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिग, गृहविलगीकरणाची माहिती गोळा करून आरोग्य विभागास देऊन या अभियानात सक्रिय सहभागी आहेत,’ असे प्रतिपादन खटावचे सरपंच नंदकुमार वायदंडे यांनी केले.
ग्रामीण भागात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आशा सेविका व अंगणवाडी सेविका योध्याच्या रूपात महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. त्यांना ग्रामपंचायतीच्यावतीने सॅनिटायझर, ऑक्सिमीटर देण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपसरपंच अमर देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दीपक घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी
आशा सेविका गट प्रवर्तिका शिला कुंभार, मनिषा इंगावे, नीता जाधव, संगीता दरेकर, सुहासिनी डेंगळे, द्राक्ष कांबळे, रुपाली शिंदे, सुनीता कदम, शीतल वायदंडे उपस्थित होते.