कऱ्हाडला कोरोनाचा चढता आलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:40 IST2021-04-04T04:40:14+5:302021-04-04T04:40:14+5:30

कऱ्हाड : कोरोनाने कऱ्हाड तालुक्याला पुन्हा एकदा विळखा घातलाय. सद्यस्थितीत तालुक्यातील बहुतांश गावे बाधित आहेत. गतवर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर ...

The ascending graph of the corona to Karhad | कऱ्हाडला कोरोनाचा चढता आलेख

कऱ्हाडला कोरोनाचा चढता आलेख

कऱ्हाड : कोरोनाने कऱ्हाड तालुक्याला पुन्हा एकदा विळखा घातलाय. सद्यस्थितीत तालुक्यातील बहुतांश गावे बाधित आहेत. गतवर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा कहर अनुभवलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा त्याच भीतीने ग्रासले असून, संक्रमणाचा आलेख वाढतच असल्याचे दिसून येते.

कऱ्हाड तालुक्यात गतवर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाचा शिरकाव झाला. तालुक्यातील तांबवे गावात पहिला बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर म्हारूगडेवाडी तसेच बाबरमाचीतही बाधित सापडले. सुरुवातीला रूग्णवाढीचा वेग कमी होता. मात्र, वनवासमाची व मलकापूर ही दोन गावे कोरोनाच्या जबड्यात सापडल्यानंतर पहिल्या टप्प्यात रुग्णांची खरी साखळी तयार झाली. २२ एप्रिलला या दोन्ही गावात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता आणि त्यानंतर रुग्णांची तयार झालेली साखळी धक्कादायक अशीच होती. जुलैअखेर तालुक्यातील बाधितांची संख्या ८२३ होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात कोरोना संक्रमण वाढले. एका महिन्यात तालुक्यात तब्बल २ हजार ५००पेक्षा जास्तजण बाधित आढळले. त्यामुळे बाधितांचा आकडा ३ हजारपार गेला. सप्टेंबर महिनाही धक्कादायक ठरला. या महिन्यात तब्बल चार हजारांवर बाधित रुग्ण आढळले. त्यातच प्रशासनाने केलेल्या नियोजनाचे तीनतेरा वाजले. रुग्णांना बेड उपलब्ध होत नव्हते. व्हेंटिलेटरचा तर पत्ताच नव्हता. त्यामुळे उपचाराअभावी अनेकांना जीव गमवावा लागला. त्या तुलनेत ऑक्टोबर महिना दिलासादायक ठरला.

गतवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून संक्रमणाचा वेग मंदावला. त्याबरोबरच नागरिकांमधील धास्तीही कमी झाली. चार महिने संक्रमणाचा आलेख उतरता राहिला. मात्र, मार्च महिन्यात पुन्हा संक्रमणाने उसळी घेतली. एका महिन्यात साडेपाचशेपेक्षा जास्त बाधित आढळले असून, एप्रिलच्या सुरूवातीलाही संक्रमणाचा वेग कायम आहे.

- चौकट

कोरोना अपडेट

एकूण बाधित : १०,५२२

कोरोनामुक्त : ९,८५९

दुर्दैवी मृत्यू : ३६०

उपचारात : ३०३

- चौकट

कुठे किती रुग्ण..?

कऱ्हाड शहर : २६६५

मलकापूर शहर : १२१७

कऱ्हाड ग्रामीण : ६६४०

- चौकट

कोरोना संक्रमणाचा लेखाजोखा

मार्च : ०

एप्रिल : ३३

मे : १४८

जून : १५९

जुलै ५१९

ऑगस्ट : २९९७

सप्टेंबर : ४३९५

ऑक्टोबर : १००२

नोव्हेंबर : २९८

डिसेंबर : १७१

जानेवारी : ८९

फेब्रुवारी : १३८

मार्च : ५७३

- चौकट

सप्टेंबरमध्ये सर्वाधिक मृत्यू; जानेवारी, फेब्रुवारीत दिलासा!

कऱ्हाड तालुक्यात आजअखेर कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या ३५१ आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात २, मे ३, जून ३, जुलै १७, ऑगस्ट ८१ तर सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक म्हणजेच १६० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत्यूचे प्रमाण कमी झाले. ऑक्टोबर महिन्यात ६०, नोव्हेंबर ११, डिसेंबरमध्ये ४ रुग्णांचा मृत्यू झाला तर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात तालुक्यात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यानंतर मार्च महिन्यात ८ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला.

- चौकट

आरोग्य केंद्रनिहाय बाधित

आरोग्य केंद्र : बाधित : मृत्यू

वडगाव हवेली : ८२० : २९

सदाशिवगड : ९६८ : २७

सुपने : ५०४ : १६

रेठरे : ५७० : ३०

काले : १८९७ : ६५

इंदोली : ३७२ : २७

उंब्रज : ७४८ : २२

मसूर : ६४९ : २९

येवती : ५८४ : ३०

कोळे : ५१२ : १६

हेळगाव : १७४ : ६

Web Title: The ascending graph of the corona to Karhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.