शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदराची कोंडी फुटेना; ‘स्वाभिमानी’चा लढा संपेना

By नितीन काळेल | Updated: November 20, 2023 19:15 IST

टप्प्याटप्प्याने गती वाढविण्याचा इशारा : कारखाना गळीत हंगामावर आंदोलनाचे सावट 

सातारा : मागील हंगामातील उसाला ४०० रुपये आणि यंदाच्या गळीतात टनाला साडे तीन हजारच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रणशिंग फुंकले असून अंतिम निर्णय होईपर्यंत लढा तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. तसेच आंदोलन टप्प्याटप्प्याने वाढविण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गळीत हंगामावर आंदोलनाचे सावट निर्माण झालेले आहे.सातारा जिल्ह्यात मागील काही वर्षांत उसाचे क्षेत्र वाढत चालले आहे. सध्या एक लाख हेक्टरवर क्षेत्र गेले आहे. महाबळेश्वरचा अपवाद वगळता सर्वच तालुक्यातील शेतकरी ऊस पीक घेत आहेत. तर जिल्ह्यात खासगी आणि सहकारी मिळून १५ हून अधिक साखर कारखाने आहेत. सध्या कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. तरीही गळीताला अजून वेग आलेला नाही. हंगामावर शेतकरी संघटनांच्या आंदोलनाचे सावट निर्माण झालेले आहे. त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागीलवर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटन ४०० रुपये द्यावेत. तसेच यंदाच्यावर्षी उसाला प्रतिटन साडे तीन हजार रुपये दर द्यावा, अशी मागणी केलेली आहे.या पार्श्वभूमीवर बहुतांशी कारखानदारांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. तर काहींनी तीन हजारांच्या आत दर जाहीर केला आहे. यामुळे स्वाभिमानीने आक्रमक भूमिका घेऊन आंदोलनाला सुरुवात केली आहे. टप्प्याटप्प्याने आंदोलनाची गती वाढविण्याचा निर्धार केलेला आहे. यातूनच रविवारी जिल्ह्यात संघटनेने चक्काजाम आंदोलन केले होते. जिल्ह्यातील या आंदोलनामुळे वाहतूक थांबली होती. या आंदोलनावेळी पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात फाैजफाटा तैनात करावा लागला होता.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदरासाठी पहिल्यापासून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील गळीत हंगामावरही परिणाम झालेला आहे. बहुतांशी कारखाने सुरू असलेतरी अपेक्षित गाळप होताना दिसून येत नाही. त्यातच स्वाभिमानीचे कार्यकर्त्यांचे आंदोलन आणि गनिमी कावा सुरू असल्याने ऊस वाहतुकीलाही अडचण निर्माण झालेली आहे. त्यातच संघटनेने ऊसदराचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत टप्प्याटप्प्याने आंदोलन वाढविण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कारखानदार मागील तुटलेल्या उसाला किती रुपये देणार आणि यंदा काय दर जाहीर करणार यावरही आंदोलनाची दिशा ठरणार आहे. कारण, उसदराची कोंडी फुटल्याशिवाय गळीत हंगामालाही वेग येणार नाही.

सातारा जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी दर जाहीर न करता गाळप सुरू केले आहे. हे बेकायदा चाललेले आहे. आम्ही मागील उसाला ४०० रुपये आणि यावर्षी टनाला साडे तीन हजार रुपये दराचा अंतिम निर्णय झाल्याशिवाय मागे हटणार नाही. यासाठी टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढणार आहे. त्याचबरोबर शक्य तेथे आंदोलन करुन दर घेणारच आहोत. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टी