शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Satara ZP: सातारा झेडपीच्या सत्ता संघर्षात एकनाथ शिंदे होमपिचवर!, महायुतीतील ‘दरी’ कमी होणार?

By प्रमोद सुकरे | Updated: February 21, 2026 15:14 IST

मकरंद पाटील, शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा करणार

प्रमोद सुकरेकराड : सातारा जिल्हा परिषद सत्तेचा संघर्ष शिगेला पोहोचला असतानाच शुक्रवारी रात्री शिंदेसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होम पिचवर म्हणजेच सुरुवातीला रात्री आठ वाजता महाबळेश्वर येथे तर त्यानंतर दरे येथे पोहोचले आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा परिषद सत्ता स्थापनेबाबत शुक्रवार आणि शनिवारी दोन दिवस खलबते होण्याची शक्यता असून याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक नुकतीच झाली आहे. या निवडणुकीत भाजपने महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) यांना बाजूला ठेवत स्वबळावर निवडणूक लढवली. त्यावेळी प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. त्यामुळे महायुतीतील तणाव वाढला आहे. त्यातच भाजपला सत्ता स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ न मिळाल्याने त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे.दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदेसेना यांनी एकमेकांशी समन्वय साधक ही निवडणूक लढवली. त्यांनी सत्ता स्थापनेपेक्षा जास्त संख्याबळ मिळवले आहे. त्यामुळे त्या दोघांची मिळून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या असताना भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी साताऱ्यात ‘भाजपचाच अध्यक्ष होईल’ असा दावा केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

मकरंद पाटील, शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा करणारदरम्यान साताऱ्यात महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन सत्ता स्थापन करावी यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असलेचे समजते. या पार्श्वभूमीवर होम पिचवर आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्री मकरंद पाटील, मंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी आज उद्या काय चर्चा करणार? सातारची सत्ता नेमकी कोणाच्या ताब्यात येणार? याबाबत उत्सुकता वाढली आहे.

टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Satara areaसातारा परिसरEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुती